कोल्हापूर : विविध व्हरायटी आणि डिझाईनचे कपडे खरेदी हा महिलांच्या आवडीचा विषय असतो. साड्यांपासून ते ड्रेसपर्यंत सर्वच प्रकारचे स्वस्तात मस्त कपडे मिळण्याचे कोल्हापुरातील ठिकाण म्हणजे महाद्वार रोड परिसर होय. या ठिकाणी अनेक दुकानांमध्ये महिलांच्यासाठी विविध प्रकारचे कपडे मिळतात. त्याचबरोबर रोजच्या वापरातील कमी किमतीचे टॉप देखील इथे मिळतात. इथे मिळणाऱ्या महिलांच्या टॉपची किंमत ही फक्त 150 रुपयांपासून सुरु होते.
advertisement
कोल्हापूरच्या महाद्वार रोड परिसरात महाद्वार चौकात सागर ड्रेसेस हे एक महिलांच्या कपड्यांचे दुकान आहे. वेगवेगळ्या प्रकारचे टॉप, कुर्ती, वन पीस, आदी अनेक प्रकारचे ड्रेसेस या ठिकाणी मिळतात. 2018 साली मंजुषा सेवेकरी यांनी त्यांचे हे सागर ड्रेसेस दुकान सुरू केले आहे. या दुकानात मिळणाऱ्या ड्रेसेसच्या नवनवीन व्हरायटीमुळे महिला आणि मुलींची नेहमीच दुकानात गर्दी असते. त्यामुळेच ग्राहकांना ड्रेस दाखवायला दुकानात मुलींचा स्टाफ देखील ठेवला असल्याचे मंजुषा यांनी सांगितले.
फक्त 150 रुपयांना टॉप
दुकानात मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या ड्रेसेस मध्ये फक्त 150 रुपयांपासून सुरुवात आहे. यामध्ये 150 रुपयांना कॉलेजवयीन तरुणींना किंवा कामावर जाणाऱ्या महिलांसाठीही टॉप दुकानात मिळतात. सुती कापडाचे हे टॉप असल्याने गरमीच्या दिवसात देखील वापरण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे हलके फुलके आणि रोज वापरता येतील असे हे टॉप असतात, असे मंजुषा यांनी सांगितले.
अजूनही वेगवेगळे ड्रेस उपलब्ध
दुकानांमध्ये कमीत कमी दहा वर्षाच्या मुलगीसाठी देखील ड्रेस उपलब्ध आहेत. तर ग्राहकांना परवडेल अशा दरात वेस्टर्न वेअर देखील दुकानात आहेत. यामध्ये जीन्स, जीन्सवर घालण्यासाठी टॉप, टी-शर्ट, जंपसुट, वन पीस अशी भरपूर व्हरायटी पाहायला मिळते. हे सर्व ड्रेसेस कमीत कमी फक्त 150 रुपयांपासून ते 550-600 रुपयांपर्यंत देखील मिळतात असेही मंजुषा यांनी सांगितले.
दरम्यान, कोल्हापुरात अनेकजण महाद्वार रोडला शॉपिंगसाठी येतात. याठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतात. तरीही सायंकाळी या रोडवर मोठी गर्दी असते. कोल्हापूरकरांसह बाहेरचे पर्यटक देखील येऊन या परिसरात खरेदी करत असतात.