जाणून घेऊया कोरियन हेअर पॅकबद्दल. केस जाड, लांब आणि मजबूत बनवण्यासाठी हेअर पॅक उपयुक्त ठरतील.
Health Tips : आहारात दडलंय थकवा वाटण्याचं कारण, लगेच करा बदल, अशक्तपणा होईल दूर
कोरियन हेअर केअरची जादू - केसांची निगा राखताना प्रामुख्यानं नैसर्गिक घटकांवर आणि टाळूच्या आरोग्यावर विशेष लक्ष दिलं जातं. निरोगी केसांचा पाया निरोगी टाळूपासून सुरू होतो. कोरियन हेअर पॅकमधले घटक केस मजबूत करण्यासाठी टाळूवर काम करतात. कोरियन हेअर केअर पद्धती मुख्यत्वे टाळू, मुळांवर केंद्रित आहे.
advertisement
यात सहसा ग्रीन टी, कोरफड आणि अंडी यासारखे घटक असतात.
कोरियन हेअर पॅक घरी बनवण्यासाठी कृती -
एक अंड, दोन टेबलस्पून एलोवेरा जेल, एक टेबलस्पून नारळ तेल, एक टीस्पून जिनसेंग पावडर (पर्यायी)
हे सर्व जिन्नस चांगले मिसळून पेस्ट तयार करा. केस सुंदर बनवण्यासाठी हा हेअर मास्क मदत करेल. या नैसर्गिक घटकांमुळे केस आणखी सुंदर दिसतील.
Hair Care : पांढऱ्या केसांवर हे उपाय नक्की करुन बघा, केस नैसर्गिकरीत्या राहतील काळे
कोरियन हेअर पॅकमधे वापरले जाणारे नैसर्गिक घटक केस केवळ बाहेरूनच नव्हे तर आतूनही मजबूत करतात. अॅलोवेरा जेलमुळे टाळू हायड्रेटेड राहतो आणि कोंडा कमी होतो. अंड्यांमधील प्रथिनं केसांच्या वाढीला प्रोत्साहन देतात, नारळाचं तेल केस तुटण्यापासून रोखतं आणि केसांना चमकदार बनवतं. जिनसेंग पावडरमुळे केसांना पोषण मिळतं.
हेअर पॅक लावण्याची योग्य पद्धत देखील खूप महत्वाची आहे. आधी, केस शाम्पूनं धुवा आणि थोडेसे वाळवा. हा हेअर पॅक टाळूला आणि केसांना पूर्णपणे लावा. केस झाकून ठेवा आणि कमीत कमी तीस मिनिटं तसंच राहू द्या. नंतर, थंड पाण्यानं धुवा. आठवड्यातून किमान एकदा तरी हा हेअर पॅक वापरा, आणि काही महिन्यांतच तुम्हाला केसांमधे फरक जाणवेल.