कफ सिरपपेक्षा अधिक सुरक्षित
विड्याची पाने आणि ओवा या नैसर्गिक घटकांपासून बनवलेला काढा हा रासायनिक कफ सिरपपेक्षा पूर्णपणे सुरक्षित असतो. याच्या सेवनाने मुलांना किंवा मोठ्यांना कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
विड्याची पाने: दाह-विरोधी गुणधर्म
विड्याच्या पानांमध्ये मजबूत दाह-विरोधी गुणधर्म असतात. यामुळे घसा आणि श्वसनमार्गाची सूज कमी होते, ज्यामुळे कोरड्या खोकल्यापासून लवकर आराम मिळतो.
advertisement
ओवा: श्वासमार्गाला करतो मोकळा
ओव्यामध्ये थायमॉल नावाचा घटक असतो, जो नैसर्गिकरित्या श्वासमार्गातील अडथळे दूर करतो. तो छाती आणि फुफ्फुसांमध्ये जमा झालेला कफ पातळ करून बाहेर टाकण्यास मदत करतो.
काढा बनवण्यासाठी साहित्य
पाणी: 1.5 कप
विड्याची पाने: 2-3 (स्वच्छ धुतलेली)
ओवा: 1 चमचा
गुळ किंवा मध: चवीनुसार
काढा बनवण्याची सोपी पद्धत
एका भांड्यात पाणी घेऊन त्यात विड्याची पाने आणि ओवा घाला. हे मिश्रण मध्यम आचेवर पाणी अर्धे होईपर्यंत (सुमारे 10-15 मिनिटे) उकळू द्या. नंतर गाळून घ्या. चवीसाठी गुळ किंवा मध मिसळा.
सेवन आणि प्रमाण
हा काढा गरम असतानाच दिवसातून 2 ते 3 वेळा प्यावा. लहान मुलांना देण्यापूर्वी त्याचे प्रमाण कमी ठेवावे आणि तज्ञांचा सल्ला घ्यावा. थंडीतील खोकल्यासाठी हा उपाय अधिक प्रभावी ठरतो. खोकल्याच्या त्रासावर विड्याची पाने आणि ओव्याचा हा साधा आणि पारंपरिक काढा तुम्हाला कोणताही धोका न पत्करता त्वरित आराम देऊ शकतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)