उदा. जी फळे आणि भाज्या लवकर खराब होतात, ती फक्त दोन किंवा तीन दिवसांसाठी तयार करून ठेवा. पण ज्या पदार्थांची 'शेल्फ लाईफ' (जास्त काळ टिकण्याची क्षमता) चांगली असते, ते पूर्ण आठवड्यासाठी तयार करून ठेवू शकता. या सोप्या पद्धतीमुळे तुम्ही ताजे आणि पौष्टिक पदार्थ खाऊ शकाल. चला तर मग, रविवारच्या 'मील प्रेपिंग'ची दोन भागांत विभागणी कशी करायची, ते पाहूया...
advertisement
1) दोन दिवसांसाठी तयारी (Bi-weekly Meal Preps)
पुढील दोन किंवा तीन दिवसांसाठी लागणाऱ्या भाज्या चिरून आणि कापून ठेवा, जेणेकरून त्या ताज्या राहतील. तुम्ही एका जेवणात चिकन किंवा मासे यांचा समावेश करू शकता, तर दुसरे जेवण पूर्णपणे शाकाहारी ठेवा. नाश्त्यासाठी किंवा कामाच्या ठिकाणी दुपारच्या वेळेत हलका नाश्ता म्हणून आठवड्यातून दोन वेळा मोड आलेली कडधान्ये तयार करून ठेवा. भाज्या आणि इतर पदार्थ सहज शिजवण्यासाठी एक 'स्लो-कुकर' खरेदी करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दर रविवारी 10 मिनिटे वेळ काढून तुमच्या आठवड्याचा मेनू ठरवा. यामुळे तुम्हाला काय खायचे आहे आणि कधी खायचे आहे, हे आधीच कळेल.
2) आठवड्याभरासाठी तयारी (Weekly Meal Preps)
ओट्स-दालचिनीचे कुकीज, संपूर्ण गव्हाचे किंवा मल्टीग्रेन ब्राउनीज, तसेच सुक्या मेव्याचे छोटे डबे आठवड्याच्या 'मील प्रेप'मध्ये ठेवा. हे कोरडे पदार्थ एका आठवड्यापर्यंत खराब होत नाहीत. कुकीज हवाबंद डब्यांमध्ये ठेवू शकता, ब्राउनीज फ्रिजमध्ये ठेवू शकता आणि ड्रायफ्रूट्स किचनमध्येच ठेवता येतात.
तुमची कल्पनाशक्ती वापरून आणि कॅलरी लक्षात घेऊन ऑफिसमधील नाश्त्यासाठी आरोग्यदायी पदार्थांची यादी तयार करा. याचप्रमाणे, लसणाच्या पाकळ्या सोलून ठेवा, वाटाणे सोलून ठेवा आणि ताजी फळे आणि भाज्या पाण्यामध्ये किमान दोन तास भिजत ठेवून मग त्यांचा साठा करा. यामुळे तुम्ही ती सालीसह खाऊ शकाल आणि तुम्हाला चांगल्या प्रमाणात फायबर मिळेल. शेवटी, जेवण अधिक चविष्ट बनवण्यासाठी पुदिना आणि कोथिंबीरची प्रीबायोटिक चटणी तयार करून ठेवा.
हे ही वाचा : वजन कमी करायचंय? नाश्त्यामध्ये खा 'हे' 5 पदार्थ, 100 पेक्षा कमी कॅलरीमध्ये मिळेल भरपूर ऊर्जा!
हे ही वाचा : रोज सकाळी तोच तोच ब्रेकफास्ट? 7 दिवस ट्राय करा 'या' 7 पौष्टिक आणि झटपट नाश्ता रेसिपी, लगेच वाचा!