हे सुद्धा वाचा : हिवाळ्यात का उद्भवते केस गळण्याची समस्या? यामागचं नेमकं कारण काय?
पाणी बदलल्याने केस गळतात का?
श्रीबालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ सल्लागार आणि त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विजय सिंघल यांच्या मते, केस कमकुवत होवून ते गळून पडण्यासाठी पाणी हे कारणीभूत असू शकतं. मात्र पाण्यातल्या बदलामुळे नाही तर खराब गुणवत्तेच्या पाण्यामुळे केस गळण्याचा त्रास होऊ शकतो. पाणी हे जरी स्वच्छ दिसत असलं तरीही त्यात क्लोरीनचं प्रमाण हे अपेक्षेपेक्षा जास्त असेल किंवा त्याची pH लेव्हल ही जास्त असेल तर असं पाणी हे फक्त तुमच्या केसांसाठीच नाही तर एकूणच आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं. क्लोरिनशिवाय पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या धातूंचं प्रमाण जास्त असेल तर ते पाणी सुद्धा केसांसाठी धोक्याचं ठरू शकतं. याशिवाय तुम्ही वापरत असलेल्या पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाण तर ते केसगळतीचं कारण ठरू शकतं. यामुळे केसांच्या मुळांना नुकसान होऊन केसगळतीला सुरूवात होऊ शकते. शिवाय अशा पाण्याने अंघोळ केल्यामुळे टाळूतला ओलावा नाहीसा होऊन केस कोरडे पडायला सुरूवात होते.
advertisement
हे सुद्धा वाचा : Hair Care : फक्त त्वचाच नव्हे तर केसांसाठीही फायदेशीर आहे बेसन; असा करा वापर
जर तुम्ही घर बदललं असेल किंवा तुमच्या पाण्यात झालेल्या बदलामुळे केसगळतीचा त्रास सुरू झाला असेल तर या टिप्स् वापरून तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता.
केसगळती रोखण्यासाठी उपाय
- केसांना मजबुती येण्यासाठी भरपूर पोषक तत्त्वं असलेला आहार घ्या. तुमच्या आहारात जीवनसत्त्वं, प्रथिनं आणि खनिजं असतील याची काळजी घ्या. ज्यामुळे अन्नातून केसांना पोषक तत्त्वं मिळून केसांना मजबूती येईल आणि केस गळण्याचं प्रमाण कमी होईल.
- हिवाळ्यात थंडीमुळे किंवा खराब गुणवत्ता असलेल्या पाण्यामुळे केस कोरडे पडतात. त्यामुळे केसांचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करा.यामुळे केस तुटण्याचं प्रमाण कमी व्हायला मदत होईल.
- आठवड्यातून एकदा बदाम, आवळा किंवा खोबरेल तेलाने केसांना चांगली मॉलिश करा. हे तेल केसांच्या मुळापर्यंत जाईल याची काळजी घ्या. तेलाच्या मॉलिशमुळे केसांची मुळं तर मजबूत होतीलच मात्र त्यांचा ओलावाही टिकून राहील.
- पाणी शुद्ध करण्यासाठी आर ओ फिल्टर किंवा सॉफ्टनर वापरा. यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारून केसांचं आरोग्य अबाधित राहील.
- तुमच्या घरात असलेली पाण्याची टाकी किंवा सोसायटीमध्ये असलेली मुख्य पाण्याची टाकी ठराविक वेळेत स्वच्छ होईल याची काळजी घ्या. जेणेकरून स्वच्छ पाणी शरीरासाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरेल.