हॉट चॉकलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य..
- मखाना
- खजूर
- बदाम
- काजू
- कोको पावडर
- डार्क चॉकलेट
- दूध
- व्हॅनिला एसेंस (ऐच्छिक)
- दालचीनी पावडर (ऐच्छिक)
हॉट चॉकलेट बनवण्या कृती
- कढईत मध्यम आचेवर मखाना 4-5 मिनिटे हलके तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत ड्राय रोस्ट करा. थंड होऊ द्या.
advertisement
- त्याच कढईत बदाम आणि काजू 2-3 मिनिटे हलके रोस्ट करून घ्या.
- आता रोस्ट केलेल्या मिश्रणामध्ये गरमागरम दूध घाला आणि हे मिश्रण 15 मिनिटे असेच राहू द्या.
- त्यानंतर हे सर्व मिक्सरमध्ये घालून त्याची मऊसूत पेस्ट बनवून घ्या.
- आता एका नॉन-स्टिक पॅनमध्ये हे बारीक केलेले मिश्रण घाला. त्यात आणखी थोडे दूध आणि कापलेली डार्क चॉकलेट घाला.
- गॅसची आच मंद ठेवा आणि नंतर 2-3 मिनिटे ते उकळू द्या.
- 2-3 मिनिटे मंद आचेवर उकळल्यानंतर चॉकलेट पूर्ण वितळेल आणि मिश्रण एकदम क्रीमी होईल.
- शेवटी तुमची इच्छा असल्यास व्हॅनिला एसेंस आणि दालचीनी पावडर (ऐच्छिक) घालून गॅस बंद करा.
अशा प्रकारे तयार आहे तुमचे गरमागरम हॉट चॉकलेट. एका कपमध्ये ते घेऊन त्यावरून थोडे कोको पावडर किंवा बारीक कापलेले काजू, बदाम आणि पिस्ता घाला.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
