TRENDING:

Milk Boiling Tips : पॅकेटचे दूध उकळावे की नाही? डॉक्टर म्हणाले, 'ही' एक चूक ठरू शकते महाग..

Last Updated:

Packet milk boiling right or wrong : कोणतंही दूध घरी आणताच उकळणे ही भारतीय परंपराच आहे. म्हणून हे पॅकेज्ड दूधदेखील घरी आणताच आपण आधी उकळी येईपर्यंत तापवतो. मात्र हे करणे खरंच योग्य आहे का? चला जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पूर्वी आपल्याकडे दूधवाला दूध घेऊन यायचा बहुतांशवेळा हे दूध चांगल, पौष्टिक आणि शुद्ध असायचं. मात्र आता कोणत्याच दुधाची खात्री राहिलेली नाही. आता बरेच लोक पॅकेटचे दूध वापरणे सोयीचे मानतात. कोणतंही दूध घरी आणताच उकळणे ही भारतीय परंपराच आहे. ही परंपरा पिढ्यानपिढ्या कोणत्याही प्रश्नाशिवाय पाळली जात आहे. म्हणून हे पॅकेज्ड दूधदेखील घरी आणताच आपण आधी उकळी येईपर्यंत तापवतो. मात्र हे करणे खरंच योग्य आहे का? चला जाणून घेऊया.
दूध गरम न करता वापरण्यास सुरक्षित आहे?
दूध गरम न करता वापरण्यास सुरक्षित आहे?
advertisement

डॉ. मनन व्होरा यांनी इंस्टाग्रामवर स्पष्ट केले की, पॅकेज्ड दूध आधीच उच्च तापमानात गरम केले जाते, ज्यामुळे हानिकारक जीवाणू नष्ट होतात. म्हणून ते पुन्हा उकळणे अनावश्यक आहे आणि ते आपल्या जुन्या मानसिकतेचा एक भाग आहे. आजचे पाश्चराइज्ड आणि अल्ट्रा-पाश्चराइज्ड दूध उकळण्याची आवश्यकता नाही. चला पाहूया दुष्ट वारंवार तापवल्याने कोणते नुकसान घेऊ शकतात.

advertisement

पोषक घटक होतात नष्ट

जास्त उकळल्याने दुधाची चव खराब होऊ शकते आणि त्यातील पोषक घटक नष्ट होऊ शकतात. जर तुम्हाला दूध गरम करायचे असेल तर कधीकधी हलके उकळणे पुरेसे असते. बरेच लोक दूध उकळून क्रीम काढतात आणि नंतर तूप बनवतात. मात्र भारतातील काही लोकांना दुधाच्या गुणवत्तेबद्दल खात्री नसते, म्हणून ते ते पूर्णपणे उकळणे पसंत करतात.

advertisement

दूध गरम न करता वापरण्यास सुरक्षित आहे?

डॉक्टर सल्ला देतात की, जर दूध ताजे आणि योग्यरित्या साठवले असेल तर ते लगेच वापरले जाऊ शकते. जर तुम्हाला कोमट दूध प्यायचे असेल तर ते हलके गरम करणे ठीक आहे, परंतु ते जास्त उकळणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

दूध कधी उकळणे आवश्यक आहे?

जर तुम्ही थेट कोणाकडून कच्चे दूध खरेदी करत असाल तर वापरण्यापूर्वी ते उकळणे आवश्यक आहे. कारण त्यात साल्मोनेला, ई. कोलाय आणि लिस्टेरिया सारखे हानिकारक बॅक्टेरिया असतात, जे सेवन केल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. शिवाय उकळल्याने दुध लवकर खराब होत नाही आणि त्याचे शेल्फ लाइफ वाढते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दराची घसरगुंडी कायम, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Milk Boiling Tips : पॅकेटचे दूध उकळावे की नाही? डॉक्टर म्हणाले, 'ही' एक चूक ठरू शकते महाग..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल