खरं तर, थोडी काळजी आणि काही सोप्या युक्त्या वापरल्यास मिक्सर ग्राइंडरची साफसफाई अगदी सोप्या पद्धतीने करता येते आणि त्याचं आयुष्यही वाढवता येतं. चला तर जाणून घेऊया मिक्सर ग्राइंडर स्वच्छ करण्याच्या काही सोप्या आणि प्रभावी पद्धती.
1. मिक्सर ग्राइंडरचे वेगवेगळे भाग नीट स्वच्छ करा
साफसफाई करण्यापूर्वी मिक्सरचा प्लग काढा आणि सर्व भाग वेगळे करा. सर्वात जास्त अन्नाचे अंश जारच्या तळाशी चिकटतात. त्यामुळे प्रत्येक वापरानंतर कोमट पाण्यात थोडंसं डिशवॉश लिक्विड घालून जार स्वच्छ धुवा. हवं असल्यास जारमध्ये थोडं पाणी आणि साबण घालून थोडावेळ मिक्सर चालवा. त्यामुळे जार आपोआप आतून स्वच्छ होतो.
advertisement
ब्लेडस्:
ब्लेड्स साफ करताना काळजी घ्या, कारण ते धारदार असतात. ब्लेड्स खूप घासल्यास त्यांची धार कमी होते. योग्य पद्धत म्हणजे ब्लेड्स थोडावेळ कोमट साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवणे आणि मग टूथब्रशने किंवा मऊ कपड्याने स्वच्छ करणं.
बेस युनिट:
मिक्सरचा बेस भाग कधीही पाण्यात बुडवू नका. त्याऐवजी ओलसर मायक्रोफायबर कापडाने पुसा. बटणं आणि कोपरे स्वच्छ करण्यासाठी टूथब्रश वापरू शकता. स्वच्छ झाल्यावर कोरड्या कपड्याने पुसून घ्या आणि पूर्णपणे सुकल्यावरच पुन्हा प्लग लावा.
झाकणं:
झाकणं स्वच्छ करणं सोपं असतं. स्पंज किंवा मऊ ब्रशने कोमट साबणाच्या पाण्याने धुवा. रबर गॅसकेट आणि झाकणाखालील लहान जागाही स्वच्छ करा. नंतर कोरड्या कपड्याने पुसून सुकवा.
2. योग्य क्लिनिंग एजंट वापरा
दररोजच्या साफसफाईसाठी साधं लिक्विड डिशवॉश साबण पुरेसं असतं. पण जर जिद्दी डाग, तेलकटपणा किंवा वास असेल, तर व्हिनेगर (सिरका), लिंबाची साल किंवा बेकिंग सोडा वापरू शकता.
लिंबं आणि व्हिनेगरमध्ये असणाऱ्या आम्लीय गुणधर्मामुळे तेलकटपणा सहज निघतो आणि दुर्गंधीही नाहीशी होते.
3. कधी स्वच्छ करावं हे जाणून घ्या
प्रत्येक वापरानंतर लगेच मिक्सर धुतल्यास अन्नाचे अंश सुकत नाहीत आणि जंतू तयार होत नाहीत.
जर मिक्सरमधून वास येत असेल किंवा चालवताना त्रास होत असेल, तर समजा त्याला डीप क्लिनिंगची गरज आहे. नियमित साफसफाई केल्याने मिक्सरचं कार्यक्षमता टिकून राहते आणि त्याचं आयुष्य वाढतं.
4. डीप क्लिनिंगसाठी खास उपाय
सोख अँड स्क्रब पद्धत: जार, ब्लेड्स आणि झाकणं 15-20 मिनिटं कोमट साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर ब्रशने स्वच्छ करा.
बेकिंग सोडा पेस्ट: डाग किंवा गंजासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट तयार करा, ती डागावर लावा आणि रात्रभर ठेवा. सकाळी स्क्रबरने हलकं घासा.
रबिंग अल्कोहोल: सर्व भाग सुकल्यावर रबिंग अल्कोहोलने पुसल्यास जंतू पूर्णपणे नष्ट होतात.
5. साफ करताना टाळावयाच्या चुका
जार आणि झाकणं घासताना हार्ड स्क्रबर वापरू नका. त्याने पृष्ठभाग खराब होतो.
बेस युनिट कधीही पाण्यात बुडवू नका.
ब्लिच किंवा तीव्र रसायनं वापरू नका त्याने मिक्सर खराब होऊ शकतो आणि अन्न दूषित होण्याची शक्यता असते.
प्रत्येक भाग स्वच्छ केल्यानंतर पूर्णपणे सुकवून मगच जोडावा.
भाग जबरदस्तीने लावू नका; त्यामुळे मिक्सरचे लॉकिंग तुटू शकते.
थोडीशी नियमित काळजी, योग्य पद्धती आणि स्वच्छतेची सवय एवढंच पुरेसं आहे तुमचा मिक्सर ग्राइंडर नेहमी चमकता आणि सुरळीत चालू ठेवण्यासाठी.