तसं तुम्ही प्लॅस्टिकची मोठी भांडी पावसाचं पाणी साठवण्यासाठी वापरत असाल. पण छोट्या छोट्या भांड्याचाही तुम्हाला पावसात वापर करता येऊ शकतो. पावसात बऱ्याच समस्या असतात. यापैकी तुमची एक समस्या घरातील याच छोट्या प्लॅस्टिक भांड्यामुळेच दूर होईल. प्लॅस्टिक भांडी इतकी कामाची असू शकतात, असंच तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणाल. यासाठी तुम्हाला फक्त भांड्यांना भोकं पाडायची आहेत.
advertisement
नेमकं करायचं काय?
प्लॅस्टिक कंटनेर घ्या. डबा असेल तर त्यावर झाकण असतं. या झाकणाला भोकं पाडा. एखादी टोकदार वस्तू किंवा काट्याचा चमचा घेऊन तो गॅसवर थोडा गरम करून त्याच्या मदतीनं झाकणाला छिद्र पाडा. एखाद्या भांड्याला झाकण नसेल त्याचं तोंड लहान असेल तर खाली थोडी जागा राहिल असं लक्षात घेऊन बाजूने छिद्र करा. जसं या व्हिडीओत दाखवलं आहे.
Jugaad Video : पावसात अगरबत्तीचा रिकामा बॉक्स मोठा कामाचा; कुणालाच माहिती नसेल हा जुगाड
आता या भांड्यात मीठ टाका, डिश वॉश डिटर्जंट किंवा कोणतंही लिक्विड डिटर्जंट टाका. हे मिठात मिक्स करा किंवा तसंच ठेवलं तरी काही हरकत नाही. आता यात फिनाईलच्या गोळ्या टाका. झाकण बंद करून हा डबा घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्या.
याचा फायदा काय?
पावसाळ्यातील समस्यांपैकी एक म्हणजे घरात माश्या येणं. एरवी कधीच न दिसणाऱ्या माश्या पावसात मात्र मोठ्या प्रमाणात दिसून येतात. घराबाहेरच नव्हे तर घरातही माशा फिरताना दिसतात. कितीही स्वच्छता ठेवा तरी या माश्या येतातच. याच माश्यांपासून हा जुगाड सुटका देईल. डब्यातील मिश्रणाच्या वासामुळे घरातील माश्या लगेच पळून जातील आणि एकही माशी घरात घुसणार नाही.
इथं पाहा व्हिडीओ
Maa, yeh kaise karun? युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Jugaad Video : पावसाळ्यात झाडूला कांदा जरूर लावा; मोठा फायदा
(सूचना : या लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची खातरजमा करत नाही.)