Monsoon Tips : पावसात छत्रीवर सुद्धा वीज पडू शकते का? मोबाईल बंद ठेवायचा?
घरात 5 झाडे ठेवल्यास डास घराच्या जवळही फिरकणार नाहीत.
तुळस: तुळशीला धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व आहे. आपल्याकडे प्रत्येकाच्या दारात तुळशीचं झाड असतंच. याच तुळशीच्या वासामुळे घराजवळ डास फिरकत नाहीत. त्यामुळे आवर्जून हे झाड घरात ठेवावं, असं कर्णिक सांगतात.
advertisement
पुदिना: आपल्याकडे स्वयंपाक घरामध्ये पुदिन्याचा वापर होतो. पण जर पुदिन्याचे झाड आपण घरात ठेवलं तर यामुळे देखील डास घरात येत नाहीत. कारण पुदिन्याच्या वासामुळे डास फिरकत नाहीत.
गवती चहा: गवती चहा जसा आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे तसाच तो जर आपण आपल्या घरामध्ये ठेवला किंवा त्याचा पाला काढून आपल्या घराभोवतीत टाकला तर त्यामुळे देखील डास येणार नाहीत.
झेंडू: झेंडूचां वास हा डासांना सहन होत नाही. बरेचजण अंगणात झेंडू लावतात. पण हे झाड आपल्या घरात इनडोअर प्लांट म्हणून ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं.
सिट्रोनेला: सिट्रोनेला हे झाड देखील आपण आपल्या घरात ठेवलं तर डास येत नाहीत. त्यासाठी आपण हे झाड आणून घरात ठेवू शकता आणि पावसाळी आजार टाळू शकता.
दरम्यान, डासांचा धोका टाळण्यासाठी आपण आयुर्वेदिक उपाय वापरू शकता. घरात झाडे लावून देखील आपण पावसाळी आजार आणि त्यापासून होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.





