TRENDING:

Morning Routine : सकाळी या चांगल्या सवयींमुळे पोट एका क्षणात होईल साफ, पचनक्रियाही राहील निरोगी

Last Updated:

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे छातीत जळजळ होणे, अपचन यांसारख्या पचनाशी संबंधित समस्याही होतात. तेव्हा सकाळी पोट एका क्षणात साफ करायचं असेल तर सकाळी उठल्यावर काही सवयी पाळायला हव्यात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सध्या बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेकांना पोट साफ न होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे छातीत जळजळ होणे, अपचन यांसारख्या पचनाशी संबंधित समस्याही होतात. तेव्हा सकाळी पोट एका क्षणात साफ करायचं असेल तर सकाळी उठल्यावर काही सवयी पाळायला हव्यात.
सकाळी या चांगल्या सवयींमुळे पोट एका क्षणात होईल साफ
सकाळी या चांगल्या सवयींमुळे पोट एका क्षणात होईल साफ
advertisement

गरम पाण्याने मिळेल आराम :

सकाळी उठल्यावर गरम पाणी पिणे फायदेशीर ठरते. तसेच कोमट पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकल्याने पचनक्रिया सुधारते. तुम्ही पाण्यात आले किंवा आल्याची पूड, तुळशीची पाने, तमालपत्र, लवंगा, दालचिनी, वेलची, ओरेगॅनो यांसारख्या गोष्टीही पाण्यात घालू शकता. या गोष्टी घालून पाणी उकळवा आणि मग ते कोमट झाल्यावर प्या.

advertisement

सकाळी रिलॅक्स रहा :

जेव्हा तुम्ही सकाळी शांत मानाने उठता तेव्हा तुमची पचनक्रिया देखील सुलभ होण्यास मदत होते. सकाळी निवांत राहून उठल्याने शरीर नैसर्गिकरित्या कार्य करते. मोठ्या आवाजाने किंवा घाई घडबडीत तुम्ही जागे झालात तर तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो.

स्वतःला वेळ द्या :

जीवनशैली आणि अनेक जबाबदाऱ्यांमुळे प्रत्येकजण आपापल्या दिनक्रमात व्यस्त असतो. मात्र, यातही स्वत:साठी काही वेळ काढावा. सकाळी स्वतःला वेळ द्या आणि संगीत ऐका, योगासने करा, ध्यान करा. अशा गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद वाटेल. जेव्हा आपण शांत आणि तणावमुक्त असतो तेव्हा आपली पचनसंस्था उत्तमरीत्या काम करते.

advertisement

नाश्त्यात काय खातो हे गरजेचं :

बऱ्याचदा लोक नाश्त्याला जास्त महत्व देत नाहीत. परंतु असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. सकाळचा नाश्ता हा दिवसभर काम करण्याकरता ऊर्जा देण्यासाठी महत्वाचा असतो. चांगले पचन राखण्यासाठी तुमचा नाश्ता आरामात घ्या. खुर्चीवर बसा आणि टीव्ही, मोबाईल फोन, वर्तमानपत्र इत्यादींपासून दूर राहा. नाश्ता करताना स्वतःला चांगल्या सवयी लावल्याने पचनक्रिया चांगली राहते.

advertisement

या गोष्टींची घ्या काळजी :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
खरेदीची ही संधी नका सोडू! चामड्याच्या वस्तू 30 रुपयांपासून! मुंबईत हे आहे ठिकाण
सर्व पहा

कमी आवाजाचा अलार्म सेट करा. रात्री लवकर झोपायला जा, रात्री 10 ते 11 पर्यंत झोपण्याची उत्तम वेळ आहे. रात्रीच्या चांगल्या झोपेमुळे तुम्ही अलार्म वाजण्याच्या आत जागे व्हाल. पुरेशी झोप उत्तम आरोग्यासाठी सर्वात महत्वाची आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Morning Routine : सकाळी या चांगल्या सवयींमुळे पोट एका क्षणात होईल साफ, पचनक्रियाही राहील निरोगी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल