जगभरातील दुर्मिळ प्रजातीची फुले, कलाकारांनी फुलांपासून साकारलेल्या अनोख्या कलाकृती, सोबतच स्थानिक हस्तकला आणि खाद्यसंस्कृतीची चव या महोत्सवांमध्ये अनुभवता येते. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल आणि फुलांच्या जादुई दुनियेत हरवून जायचे असेल, तर भारतातील या सर्वात मोठ्या आणि सुंदर फ्लावर फेस्टिव्हल्सना एकदा तरी भेट द्यायलाच हवी.
भारतातील 4 प्रसिद्ध फ्लॉवर फेस्टिव्हल्स..
advertisement
लालबाग फ्लॉवर शो, बंगळूरु (कर्नाटक) : हे फ्लॉवर फेस्टिव्हल 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोन दिवशी होते. याची सुरुवात 19 व्या शतकात म्हैसूरच्या राजाने केली होती. फुलांपासून बनवलेले ताजमहल किंवा स्मारके हे खास आकर्षण असते. येथे भारतातील सर्वात मोठे असलेले बोनसाई गार्डन पाहण्यासारखे आहे.
ट्यूलिप फेस्टिव्हल, श्रीनगर (जम्मू-काश्मीर) : दरवर्षी मार्च आणि एप्रिल दरम्यान हे फ्लॉवर फेस्टिव्हल आयोजित केले जाते. इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन येथे हा उत्सव साजरा होतो. येथे ट्यूलिपच्या 60 हून अधिक जाती पाहायला मिळतात. यासोबतच स्थानिक संगीत, नृत्य आणि कश्मिरी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील येथे असतात.
मलाबार फ्लॉवर फेस्टिव्हल, कोझिकोड (केरळ) : हे फ्लॉवर फेस्टिव्हल डिसेंबर आणि जानेवारी मध्ये आयोजित केले जाते. या महोत्सवात दुर्मिळ ऑर्किड आणि बोनसाई वनस्पतींचे प्रदर्शन केले जाते. येथे गार्डनिंग वर्कशॉप्स आणि पर्यावरणपूरक प्रदर्शने अनुभवता येतात. तसेच केरळच्या चविष्ट पदार्थांची चव घेता येते.
इंटरनॅशनल फ्लॉवर फेस्टिव्हल, गंगटोक (सिक्कीम) : मे महिन्यामध्ये पालजोर स्टेडियम येथे हे फ्लॉवर फेस्टिव्हल असते. हिमालयीन क्षेत्रातील फुलांचे सौंदर्य आणि इको-टूरिझमला प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे. येथे ऑर्किड, रोडोडेंड्रॉन, प्रिम्युला आणि मॅग्नोलियासारखी दुर्मिळ फुले पाहण्याची संधी मिळते.
या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
