या दुकानात विविध प्रकारच्या फुलांचे पीस फक्त 3 रुपयांना मिळतात. झेंडूच्या माळाही वेगवेगळ्या आकारांमध्ये उपलब्ध आहेत. लहान माळा 80 रुपयांना, मध्यम 120 रुपयांना, तर 5 फूट लांब माळा केवळ 350 रुपयांना मिळते. यासोबतच गणपती मंडप सजवण्यासाठी लागणारे तोरण, रांगोळीचे छापे, रेडीमेड रांगोळी देखील येथे विक्रीस उपलब्ध आहे. रांगोळीचे छापे 30 रुपयांपासून तर रेडीमेड रांगोळी 60 रुपयांपासून मिळते.
advertisement
फुलांचे मोठे फ्लॉवर पॉट 250 रपये, लटकन 300 रुपयांत डझन, 50 मीटरपासून कपडा, नेटमध्ये पाहिजे असेल तर 25 रुपये मीटरपासून मिळतो. फुलांचे बुके 120 रुपयांपासून, फुलांपासून सजवलेलं गेट 350 रुपयांपसून मिळते. हेच नव्हे तर, गणपतीसाठी लागणारे हिरवे प्लास्टिक गवत, कृत्रिम पानफुलांची गेटसुद्धा येथे मिळते.
ग्राहकांना हवे असल्यास ते स्वतःच्या डिझाइननुसार मोठी तोरणे बनवून घेऊ शकतात. तसेच घरी डेकोरेशन तयार करू इच्छिणाऱ्यांसाठी रॉ मटेरियलही येथे उपलब्ध आहे. त्यामुळे संपूर्ण डेकोरेशन साहित्य होलसेल दरात मिळत असल्यामुळे मालाड येथील 'माँ शक्ती' हे दुकान गणपती डेकोरेशनसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.