TRENDING:

11 राज्यात 1 हजार गावांमध्ये 50 हजार किमीपेक्षा जास्त प्रवास, पर्यावरणासाठी जनजागृती करणारा कोण आहे हा सोलर मॅन?

Last Updated:

चेतन यांनी सांगितले की, भीकन गावाजवळच त्यांनी 2010 मध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून पहिली शाळा सुरू केली. याचे नाव एज्युकेशन पार्क असे ठेवण्यात आले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राधिका कोडवानी, प्रतिनिधी
सोलर बस
सोलर बस
advertisement

इंदूर : लोकांना पर्यावरणाबाबत जागरूक करण्यासाठी एका बस यात्रेवर आयआयटीचे प्राध्यापक निघाले आहेत. चेतन सिंह सोलंकी असे त्यांचे नाव आहे. चेतन सिंह सोलंकी यांना आता सोलर मॅन म्हणून ओळखले जाते. ते सध्या मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये आहोत. यावेळी लोकल18 च्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या 4 वर्षांच्या प्रवासाबाबत सांगितले.

प्राध्यापक चेतन सोलंकी आता सौरऊर्जेच्या जागृतीसह आणखी एका मिशनमध्ये गुंतले आहेत. ते लोकांना आवाहन करत आहेत की, कमीत कमी उर्जेचा वापर करा. सौरऊर्जेचा अवलंब करण्यासोबतच फ्रीज आणि एसीला बाय-बाय करायला हवे, हेही ते लोकांना समजावून सांगत आहेत. तसेच आठवड्यातून एकदा प्रेस न केलेले कपडे घाला. पर्यावरण कोणा एका व्यक्तीच्या प्रयत्नाने नाही तर सर्वांनी एकत्र आल्यानेच पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे, असे ते म्हणतात.

advertisement

मागील 4 वर्षांपूर्वी त्यांनी 11 वर्षांच्या कारकिर्दीनंतर ब्रेक घेतला आणि नोव्हेंबर 2020 मध्ये ऊर्जा स्वराज यात्रेची सुरुवात केली. या यात्रेदरम्यान त्यांच्या लक्षात आले की, ग्रामीण भागापेक्षा शहरात लोकांना समजावण्याची गरज आहे की, क्लीन एनर्जीच्या माध्यमातून कशाप्रकारे ग्रीन इंडियाची संकल्पना पूर्ण करुन आपले योगदान देता येईल. आतापर्यंत त्यांनी 11 राज्यात, 1 हजार गावांमध्ये प्रवास केला असून याबाबत जनजागृती केली आहे.

advertisement

यामध्ये त्यांनी 50 हजार किमी पेक्षा जास्त प्रवास केला आहे. त्यांची ही यात्रा 2030 मध्ये पूर्ण होणार आहे. त्यांच्या या बसमध्ये चालकासोबत 2 इतर सहकारीसुद्धा असतात. ही बस सौलऊर्जेवर चालते. यामध्ये गरजेच्या सर्ववस्तू आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनीही वीजेचा वापर त्यागला आहे. प्राध्यापक चेतन सोलंकी हे भारत सरकारच्या सौरऊर्जेचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. त्यांनी सांगितले की, सोलर मिशनमुळे मला सोलर मॅन हे नाव मिळाले. आतापर्यंत या अभियानात अडीच लाख लोक जोडले गेले आहेत.

advertisement

मुलाला चांगले शिक्षण देऊ शकले नाही, त्यामुळे होत असलेल्या दु:खातून हा व्यक्ती करतोय अनोखं कार्य

चेतन यांची सध्याची सर्वात मोठी चिंता ही देशातील डिझेल आणि कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्प आणि कारखाने आहेत. या प्रकल्पांसाठी अजूनही देशाच्या 85 टक्के ऊर्जेचा वापर होतो. त्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत आहे आणि हवामानालाही फटका बसत आहे. युरोपमध्येही सौरऊर्जेवर काम केले जाते. आतापर्यंत कोणतेही राज्य पूर्णपणे सौर राज्य बनलेले नाही. पावसात सौरऊर्जेचा काही उपयोग नाही असे लोकांना वाटते. पण तसे नाही, पावसाळ्याच्या दिवसांत त्याचे प्रमाण सुमारे 30 टक्क्यांपर्यंत घसरते. पण प्रखर सूर्यप्रकाशाने ही कमी भरुन काढता येते.

advertisement

पहिली शाळा सुरू केली -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात चढ-उतार, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

चेतन यांनी सांगितले की, भीकन गावाजवळच त्यांनी 2010 मध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून पहिली शाळा सुरू केली. याचे नाव एज्युकेशन पार्क असे ठेवण्यात आले. याठिकाणी 15 किलो व्होल्टची सिस्टम बसवण्यात आली आहे. यामुळे शाळेला वीज मिळते. तसेच रात्री शिक्षण आणि केअरटेकरच्या कुटुंबालाही वीज मिळते. 14 एकरमध्ये ही शाळा पसरलेली आहे. तसेच याठिकाणी दररोज शाळेच्या माध्यमातून 20-25 यूनिटचा वापर होते. बारावीपर्यंतच्या या शाळेत 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
11 राज्यात 1 हजार गावांमध्ये 50 हजार किमीपेक्षा जास्त प्रवास, पर्यावरणासाठी जनजागृती करणारा कोण आहे हा सोलर मॅन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल