प्रकृतीच्या अंतर्गत घडामोडींचे संकेत देणाऱ्या या नखांची काळजी घेणंही खूप आवश्यक आहे. त्वचेची आणि केसांची काळजी घेतो, त्याचप्रमाणे आपल्या नखांचीही काळजी घ्यायला हवी. यासाठी काही सहज आणि सोपे घरगुती उपाय समजून घेऊयात. या उपायांनी नखं निरोगी राहू शकतील.
Weight Loss : तुमच्या ताटात आहे वेट लॉसचं उत्तर, हे पदार्थ करा गायब
advertisement
नखांसाठी सहज सोपे घरगुती उपाय पाहूयात -
मेथीचे दाणे: मेथीमधे प्रथिनं आणि आर्द्रता भरपूर प्रमाणात असते. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. त्याची पेस्ट बनवून आणि किमान एक आठवडा दररोज वीस मिनिटं नखांना लावल्यानं नखं निरोगी राहतात. या घरगुती उपायामुळे नखं वारंवार तुटणार नाहीत.
व्हॅसलीन: नखांचे क्युटिकल्स कोरडे होतात तेव्हा नखं आणखी कमकुवत होतात. ती कमकुवत होऊ नयेत म्हणून, दररोज झोपण्यापूर्वी व्हॅसलीन लावण्याची सवय लावा. यामुळे कोरडेपणा कमी होतो तसंच नखं निरोगी, मऊ आणि चमकदार होतात.
Skin Care : महागड्या फेसवॉशला करा बायबाय, चेहऱ्याच्या ग्लोसाठी वापरा या टिप्स
दूध: दूध हे कॅल्शियम आणि प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. दूध कोमट करायचं आणि त्यात नखं केवळ दहा मिनिटं बुडवायची, यामुळे नखं निरोगी तर होतातच पण त्यांची वाढही जलद होते. नखं लवकर वाढत नाहीत अशी समस्या आहे त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे.
