नवरात्री आणि दुर्गापूजा एकाच वेळी येणारे हे उत्सव पण या दोन्ही उत्सवात काही फरक आहे. दोन्ही उत्सव देवीचे, दोन्हीमध्ये देवी दुर्गाची पूजा केली जाते, पण त्या साजऱ्या करण्याची पद्धत, परंपरा आणि शैली पूर्णपणे वेगळी आहे.
नवरात्रीचा शब्दशः अर्थ नऊ रात्री असा होतो. हा नऊ दिवसांचा उत्सव आहे. तर पाच दिवस. नवरात्री अश्विन महिन्याच्या सुरुवातीला घटस्थापनेपासून सुरू होते आणि विजयादशमी म्हणजे दसऱ्यापर्यंत असते. तर दुर्गापूजा उत्सव जो षष्ठी म्हणजे नवरात्रीच्या सहाव्या दिवसापासून सुरू होते आणि विजयादशमीला संपतो.
advertisement
नवरात्रीत 9 दिवस दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. दुर्गा पूजा ही दुर्गेच्या महिषासुराच्या वधाच्या कथेवर केंद्रीत आहे, जी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. भारतात नवरात्र प्रामुख्याने पश्चिम आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये साजरी केली जाते. गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर भारतात सर्वाधिक साजरा केला जातो. तर दुर्गा पूजा ही पूर्वेकडील प्रदेशांची एक प्रमुख परंपरा आहे. हा उत्सव विशेषतः पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशामध्ये साजरा केला जातो, बंगाली समुदाय तो एका मोठ्या उत्सवासारखा साजरा करतो.
नवरात्रीत लोक देवीची पूजा करतात आणि रात्री रंगीबेरंगी पारंपारिक कपडे घालून करून गरबा आणि दांडिया खेळतात. तर दुर्गा पूजा कला आणि संस्कृतीचा उत्सव. त्याचं तेज सुंदर सजवलेल्या पंडालमध्ये दिसून येतं, जे तात्पुरते मंदिर आहेत जिथे दुर्गा देवीच्या भव्य मूर्ती आहेत. इथं सांस्कृतिक कार्यक्रम, कविता वाचन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भोग सामुदायिक मेजवानीदेखील आयोजित केली जाते. बंगाली लोकांसाठी दुर्गा पूजा हा केवळ एक उत्सव नाही तर एक खोल भावना आहे.
दोन्ही सणांच्या विधींमधील एक प्रमुख फरक खाण्यापिण्याशी संबंधितही आहे. नवरात्रीच्या काळात बरेच लोक नऊ दिवस उपवास करतात आणि फक्त सात्विक, शाकाहारी अन्न खातात. शरीर आणि मन शुद्ध करण्याचा हा एक मार्ग मानला जातो. दुसरीकडे दुर्गा पूजा पूर्णपणे उलट आहे. इथं स्वादिष्ट अन्नाची मेजवानी आहे. रसगुल्ला, संदेशसारख्या बंगाली मिठाई आणि खिचडी, फिश फ्राय इत्यादी विविध पदार्थ लोकांना दिले जातात.
नवरात्रीत मांसाहार नाही, मग दुर्गापूजेत मांसाहार कसा?
नवरात्रीत लोक मांसाहार करत नाही पण दुर्गापूजेत मांसाहार परंपरा, संस्कृती मानली जाते. दुर्गापूजेत प्राण्यांचा बळी दिला जातो आणि त्याचं मांस शिजवून प्रसाद म्हणून वाटला जातो. ब्राह्मणही मांसाहार करतात. देवीच्या मंडपाबाहेरही लोक नॉनव्हेज विकताना दिसतील.
दुर्गा माता म्हणजे आई आपल्या मुलांसोबत राहायला आली आहे. त्यामुळे तिथले लोक तिथं जे काही बनतं, ते लोक जे काही खातातच तेच आपल्या आईला प्रेमाने खाऊ घालतात. याने देवी प्रसन्न होते असं मानतात.
(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे, जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश न्यूज18मराठीचा नाही.)