लालबाग-परळ परिसरातील सुप्रसिद्ध 'प्रारंभ कलेक्शन' या होम बुटिकमध्ये श्रावण महिन्यातील मंगळागौर निमित्ताने खास नऊवारी आणि काठपदर साड्यांचे नवीन कलेक्शन दाखल झाले आहे. पारंपरिक साजशृंगारासाठी उत्सुक असलेल्या महिलांसाठी हे कलेक्शन एक पर्वणी ठरणार आहे.
या दुकानातील साड्यांची किंमत 1300 रुपयांपासून सुरू होते. पेशवाई पैठणी साड्या विशेष आकर्षण ठरत आहेत. या साड्यांची किंमत दोन ते तीन हजार रुपयांदरम्यान आहे. या साड्यांमध्ये विविध आकर्षक रंग उपलब्ध आहे. याशिवाय, 'पुष्प इरकल' या प्रकाराच्या साड्या देखील दुकानात उपलब्ध आहेत. पट्टी पल्लूसह येणाऱ्या या साड्यांची किंमत दोन ते अडीच हजार रुपयांच्या दरम्यान असून, यामध्ये सध्या सुमारे 10 ते 15 रंग उपलब्ध आहेत.
advertisement
सध्या ट्रेंडिंग असलेला 'हाथी मोर' हा पॅटर्न देखील या दुकानात उपलब्ध आहे. पारंपरिक सौंदर्य आणि आधुनिक रंगसंगतीचा संगम असलेल्या या साड्यांची किंमत देखील दोन ते अडीच हजार रुपयांच्या दरम्यान असून, या प्रकारात सुमारे 10 ते 12 रंगांचे पर्याय आहेत. 'महेश्वरी' साड्यांनाही चांगली मागणी असून यामध्ये सुमारे 25 ते 30 रंग उपलब्ध आहेत. या साड्या ग्राहकांच्या आवडीनुसार कस्टमाईज देखील करून दिल्या जातात. महेश्वरी साड्यांची किंमत दोन हजार, अडीच हजार आणि तीन हजार आहे. 'रागा टिश्यू' साडी फक्त 1300 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
'प्रारंभ कलेक्शन'मध्ये उपलब्ध असलेल्या सर्व पॅटर्न्समध्ये नऊवारी साड्या देखील मिळत आहेत. पारंपरिक वेशभूषेचा अनुभव देणाऱ्या या साड्या श्रावणातील मंगळागौर, हरतालिका व इतर सणांसाठी चांगला पर्याय ठरू शकतात.