जास्त साखर खाल्ल्यानं वजन तर वाढतंच पण त्याचा त्वचा, मेंदू, झोप आणि एकूण आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. पण तुम्ही एक महिन्यासाठी रिफाइंड साखर सोडली तर शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त - साखरेत भरपूर कॅलरीज असतात पण त्यात कोणतेही पौष्टिक घटक नसतात. साखर कमी केल्यानं शरीरात साठवलेली चरबी जाळली जाते, ज्यामुळे वजन जलद कमी होतं, विशेषतः पोट आणि कंबरेच्या भागात हा फरक लक्षणीयरीत्या दिसून येतो.
advertisement
Almond Oil: कोरड्या त्वचेवर रामबाण उपाय, या तेलाच्या मालिशनं चेहऱ्यावर येईल चमक
ऊर्जा पातळीत चांगली वाढ - साखरेतून अल्पकालीन ऊर्जा मिळते आणि त्यानंतर थकवा येतो. साखर खाणं सोडून दिल्यानं, शरीरात कायमस्वरूपी ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर सक्रिय आणि ताजंतवानं वाटण्यास मदत होते.
त्वचा उजळते - रिफाइंड साखरेमुळे त्वचेतील कोलेजनचं नुकसान होतं, ज्यामुळे सुरकुत्या, मुरुमं आणि त्वचा निस्तेज दिसते. साखर खाणं टाळल्यानं त्वचा चमकदार आणि स्वच्छ होऊ शकते.
लक्ष केंद्रित होण्याची क्षमता - साखर जास्त खाल्ल्यानं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता निर्माण होते, वाढते. तीस दिवस साखर सोडल्यानं तुमचं मन अधिक तीक्ष्ण, शांत आणि अधिक केंद्रित होण्यास मदत होते.
झोपेची गुणवत्ता सुधारते - साखर शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडवते, ज्यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. पण साखर कमी केल्यानं गाढ आणि अधिक शांत झोप येऊ शकते.
Periods: मासिक पाळीतल्या वेदना होतील कमी, हे पदार्थ शरीराला मिळवून देतील ताकद
ताण कमी होतो - साखरेमुळे डोपामाइनमधे असंतुलन निर्माण होतं, ज्यामुळे चिडचिडेपणा आणि मूड स्विंग्स होतात. पण काही दिवसांतच मूड शांत आणि सकारात्मक होतो.
मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो - रिफाइंड साखरेचा त्याग केल्यानं, रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते, ज्यामुळे टाइप 2 मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
केवळ तीस दिवसांसाठी साखरेला निरोप द्या. यामुळे तुम्ही निरोगी, आनंदी आणि पूर्वीपेक्षा अधिक ऊर्जावान व्हाल.
