Periods : पाळीच्या कठीण दिवसात या पदार्थांची होईल मदत, अशक्तपणा होईल कमी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
मासिक पाळी हा प्रत्येक मुली आणि महिलेसाठी एक कठीण काळ असतो. काही साधे सोपे पदार्थ तुम्हाला या दिवसात उपयुक्त ठरू शकतात. जाणून घेऊयात हे पदार्थ आणि त्यांची उपयुक्तता.
मुंबई : महिन्यातले चार पाच दिवस महिलांसाठी कठीण दिवस असतात. काहींना थकवा, चक्कर येणं, आळस, अशक्तपणा आणि वेदना जाणवणं असा त्रास जाणवू शकतो. दिवसभराच्या धावपळीत शरीराला त्वरित शक्ती आणि ऊर्जा देणाऱ्या पदार्थांची आवश्यकता असते.
मासिक पाळी हा प्रत्येक मुली आणि महिलेसाठी एक कठीण काळ असतो. काही साधे सोपे पदार्थ तुम्हाला या दिवसात उपयुक्त ठरू शकतात. जाणून घेऊयात हे पदार्थ आणि त्यांची उपयुक्तता.
आवळा - आवळ्यात व्हिटॅमिन सी असतं आणि हार्मोनल संतुलन राखण्यासाठी आवळा उपयुक्त ठरतो. कच्चा आवळा, आवळ्याचा रस, आवळ्याची पावडर खाऊ शकता. आवळ्यामुळे रक्त शुद्ध होतं, केस आणि त्वचा सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळायला मदत होते.
advertisement
खजूर - दररोज सकाळी दोन ते तीन खजूर खाल्ल्यानं ऊर्जा मिळते आणि लोहाची कमतरता भरुन निघते. अशक्तपणा आणि मासिक पाळीच्या थकव्यातूनही आराम मिळतो.
तीळ - तीळांमधे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं, यामुळे हाडं आणि स्नायूंना बळकटी येते. मासिक पाळीच्या सुमारे पंधरा दिवस आधी दररोज एक चमचा भाजलेले तीळ खाल्ल्यानं वेदना आणि पायातले पेटके कमी होण्यास मदत होते.
advertisement
नारळ - नारळामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि अशक्तपणा दूर होतो. दररोज कच्चा नारळ, नारळ पाणी किंवा नारळाचा एक छोटा तुकडा घेऊ शकता. नारळ थायरॉईड आणि हाडांसाठी देखील चांगला मानला जातो.
मनुका - सकाळी रिकाम्या पोटी दहा ते बारा भिजवलेल्या काळ्या मनुका खाणं खूप फायदेशीर आहे. यामुळे रक्ताची गुणवत्ता सुधारते, लोहाची पातळी वाढते आणि शरीर ताजंतवानं होतं. त्वचा देखील तजेलदार दिसते.
advertisement
आलं, केळी, हिरव्या भाज्या, दही, डार्क चॉकलेट आणि काजू यांसारख्या गोष्टींनीही शरीराला पोषण मिळतं आणि मासिक पाळीच्या वेदना कमी होतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2025 5:57 PM IST


