शूटिंगला एकत्र, रात्रभर सेटवर सोबत; धर्मेंद्रपासून हेमा मालिनीला वेगळं करण्यासाठी वडिलांनी जंग जंग पछाडलं पण...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dharmendra-Hema Malini Affair: धर्मेंद्रसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे हेमा मालिनी यांच्या घरात खूप तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्यांचे वडील खूप घाबरले होते.
advertisement
हेमा मालिनी यांनी आपल्या आत्मचरित्र 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल' मध्ये त्यांच्या अफेअरमुळे घरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीबद्दल आणि वडिलांच्या प्रतिक्रियेबद्दल मोठा खुलासा केला आहे. हेमा मालिनींनी कबूल केले की, सुरुवातीला त्यांना धर्मेंद्र यांच्याबद्दल आकर्षण वाटत होते, पण त्यांच्या नात्याला कोणतेही भविष्य नाही हे त्यांना माहीत होते.
advertisement
advertisement
advertisement
धर्मेंद्रसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे हेमा मालिनी यांच्या घरात खूप तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्यांचे वडील खूप घाबरले होते. हेमा मालिनींनी बायोग्राफीत सांगितले की, "तेव्हा मासिके आमच्या अफेअरच्या बातम्यांनी भरलेली होती. पत्रकार सतत काहीतरी लिहित होते, ज्यामुळे घरातील शांतता भंग झाली आणि तणाव वाढत गेला."
advertisement
त्यावेळी परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून हेमा यांच्या वडिलांनी अचानक घाबरून घरी ज्योतिषी आणि पंडितांना बोलावणे सुरू केले. त्यांना हेमा यांच्या कुंडलीत काय आहे, हे जाणून घ्यायचे होते. त्यांच्या लग्नाला होणारा उशीर त्यांना सतावत होता. याच तणावामुळे वडिलांनी आयुष्यात पहिल्यांदाच शूटिंगवर माझ्यासोबत जायला सुरुवात केली, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
advertisement
हेमा यांनी लिहिले, "आऊटडोअर शूटिंगदरम्यान ते माल्टामध्ये अनेक आठवडे राहायचे होते. धर्मेंद्र यांच्यासोबत शूटिंग असल्याने वडिलांनी सोबत येण्याचा हट्ट धरला. कारमध्ये प्रवास करताना ते धर्मेंद्र यांना समजू नये म्हणून तमिळमध्ये मला सांगायचे की, मी एका कोपऱ्यात बसावे आणि ते आमच्यामध्ये बसण्याचा प्रयत्न करायचे. पण धर्मेंद्रजी नेहमी कोणतीतरी युक्ती शोधून काढायचे."
advertisement


