13 मॅचमध्ये ठोकली तिसरी डबल सेंच्युरी, वैभव सूर्यवंशीनंतर भारताला मिळणारा आणखी एक 'हिरा'!

Last Updated:
वैभव सूर्यवंशीनंतर भारतीय क्रिकेटला आणखी एक सुपरस्टार मिळण्याची शक्यता आहे. या खेळाडूने त्याच्या 13 सामन्यांमध्ये तिसरं द्विशतक झळकावलं आहे.
1/8
वैभव सूर्यवंशीने आपल्या विध्वंसक बॅटिंगने विरोधी टीमच्या बॉलरना घाम फोडला आहे, तर भारताला सापडलेला हा नवा सुपरस्टार शांत डोक्याने मोठ्या खेळी करत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकामागोमाग एक द्विशतके झळकावल्यानंतर आता तो चर्चेत आला आहे.

advertisement
2/8
कर्नाटकचा उदयोन्मुख स्टार बॅटर रविचंद्रन स्मरनने रणजी ट्रॉफीमध्ये चंडीगढविरुद्ध शानदार द्विशतक झळकावून पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. रणजी ट्रॉफीच्या या मोसमातलं त्याचं हे दुसरं द्विशतक आहे. स्मरनच्या द्विशतकी खेळीनंतर कर्नाटकने 547/8 वर डाव घोषित केला.

3/8
या सामन्यात कर्नाटकची सुरूवात खराब झाली. फक्त 13 रनवर 2 विकेट गमावल्यानंतर टीम दबावात होती, पण विकेट कीपर कृष्णन श्रीजीत आणि करुण नायर यांच्यातल्या 51 रनच्या पार्टनरशीपमुळे कर्नाटकला काही प्रमाणात स्थिरता मिळाली.

4/8
श्रीजित आऊट झाल्यानंतर नायर आणि स्मरन यांनी चौथ्या विकेटसाठी 119 रनची महत्त्वपूर्ण भागीदारी करून टीमला मजबूत स्थितीमध्ये नेलं. पण, 210 रनवर पाच विकेट गमावल्यानंतर कर्नाटकची टीम पुन्हा दबावाखाली आली.

5/8
स्मरन आणि श्रेयस गोपाल यांनी हा दबाव हाताळला आणि सहाव्या विकेटसाठी 141 रनची पार्टनरशीप केली. गोपाल 62 रनवर आऊट झाला, तरी स्मरन थांबला नाही. सातव्या विकेटसाठी त्याने विद्याधर पाटीलसोबत 76 रनची आणि आठव्या विकेटसाठी शिखर सेठीसोबत 111 रनची पार्टनरशीप केली.

6/8
स्मरन याने 16 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 227 रनची नाबाद खेळी केली. स्मरन याचे 13 व्या प्रथम श्रेणी सामन्यातील हे तिसरे द्विशतक आहे. या मोसमात त्याने पंजाबविरुद्ध 203 रन आणि केरळविरुद्ध नाबाद 220 रन केले होते.

7/8
सध्याच्या रणजी मोसमात स्मरण सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. स्मरणने या रणजी मोसमात 119 च्या सरासरीने 595 रन केल्या आहेत.

8/8
14 वर्षांखालील क्रिकेटपासून स्मरन कर्नाटककडून खेळत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 78.6 च्या सरासरीने 1,179 रन केल्या आहेत. स्मरनच्या चार शतकांपैकी तीन शतके ही द्विशतके आहेत. लिस्ट ए क्रिकेटमधील त्याची कामगिरीही तितकीच प्रभावी आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement