Yoga Asan : स्वत:साठी द्या पंधरा मिनिटं, या योगासनांनी दिवसभराचा थकवा होईल दूर

Last Updated:

दररोज संध्याकाळी फक्त पंधरा-वीस मिनिटं योगाभ्यास सुरू केलात तर आरोग्यात लक्षणीय बदल दिसून येतील. जाणून घेऊया संध्याकाळी केलेल्या पाच योगासनांबद्दल जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

News18
News18
मुंबई : शारीरिक - मानसिक ताण प्रत्येकाला असतात. पण यातूनही मार्ग काढून स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. दिवसभराची धावपळ, ताणतणाव आणि थकवा यातून थोडासा वेळ स्वत:ला देणं गरजेचं आहे. या वेळात काही मिनिटं योगा केल्यानं तुमचा दिवसभराचा थकवा तर दूर होतोच, शिवाय रात्रीची चांगली झोपही मिळते.
दररोज संध्याकाळी फक्त पंधरा-वीस मिनिटं योगाभ्यास सुरू केलात तर आरोग्यात लक्षणीय बदल दिसून येतील. जाणून घेऊया संध्याकाळी केलेल्या पाच योगासनांबद्दल जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.
बालासन - बालासन या आसनामुळे ताण आणि थकवा दूर करायला मदत होते. जमिनीवर गुडघ्यांवर बसा आणि  कंबर तुमच्या टाचांवर ठेवा. आता पुढे वाकून, कपाळ जमिनीला स्पर्श करा आणि हात पुढे करा. या स्थितीत दीर्घ श्वास घेत आणि सोडत राहा. हे आसन पाठ, खांदे आणि मानेतील ताण कमी करून मन शांत करतं आणि पचनक्रिया सुधारतं.
advertisement
मार्जरीआसन-बितिलासन - यामुळे पाठीचा कणा लवचिक करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मदत होते. हे करण्यासाठी, गुडघ्यांवर आणि तळहातांवर टेबलटॉप स्थितीत या. श्वास घ्या, हनुवटी उचला आणि पोट आत खेचा. नंतर, श्वास सोडा, पाठीचा कणा वरच्या दिशेनं गोल करा आणि हनुवटी तुमच्या छातीकडे खेचा.
हे आसन नियमितपणे करा. हे आसन पाठदुखी कमी करण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
advertisement
पश्चिमोत्तानासन - हे आसन संपूर्ण शरीरासाठी, विशेषतः मांड्यांसाठी आणि पाठीच्या कण्यांसाठी खूप फायदेशीर आहे. जमिनीवर पाय समोर पसरवून बसा. आता, श्वास सोडा आणि पुढे वाकून हातांनी पायाची बोटं पकडण्याचा प्रयत्न करा. गुडघे वाकवू नका हे लक्षात ठेवा. हे आसन मज्जासंस्था शांत करते, चिंता आणि थकवा दूर करते आणि पोटाची चरबी कमी करण्यास देखील मदत करते.
advertisement
विपरिता करणी - हे आसन करण्यासाठी, भिंतीजवळ झोपा आणि पाय भिंतीवर सरळ वर करा. कंबर भिंतीजवळ असावी आणि शरीर L आकारात असावं. तुमचे हात तुमच्या बाजूंना आरामशीर ठेवा. पाच-दहा मिनिटं या आसनात रहा. हे आसन पायांचा थकवा दूर करण्यासाठी, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि मज्जासंस्था शांत करण्यासाठी प्रभावी आहे. यामुळे डोकेदुखी आणि निद्रानाश यापासूनही आराम मिळतो.
advertisement
शवासन - योगासनात हे आसन नेहमी शेवट करावं. ते करण्यासाठी, पाठीवर झोपा. पाय थोडे लांब पसरवा.
हात तुमच्या शरीरापासून थोडे दूर ठेवा, तळवे वरच्या दिशेने ठेवा. डोळे बंद करा आणि तुमचं लक्ष तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देण्यावर केंद्रित करा. खोलवर श्वास घेत राहा. या आसनानं शरीराला आराम मिळतो.
योगासनं कशी करावीत यासाठी योग तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Yoga Asan : स्वत:साठी द्या पंधरा मिनिटं, या योगासनांनी दिवसभराचा थकवा होईल दूर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement