अजितदादांचा अजब कारभार! पत्नीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला उमेदवारी जाहीर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोलीस संरक्षणात उमेदवारी दाखल केली आहे. चिखली नगर परिषद निवडणुकीत प्रकार घडला आहे.
राहुल खंडारे, प्रतिनिधी
बुलढाणा : राज्यभर गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीलाच भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर राज्यात टीकेची झोड उडाली आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चक्क पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या युवा अध्यक्षास उमेदवारी जाहीर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे न्यायलयीन कोठडीत असलेल्या आरोपीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोलीस संरक्षणात उमेदवारी दाखल केली आहे. चिखली नगर परिषद निवडणुकीत प्रकार घडला आहे.
advertisement
9 नोव्हेंबर रोजी चिखली शहरात चिखली शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या विशाल उर्फ रिकी काकडेवर अनैतिक संबंधाच्या संशयावरून व कौटुंबिक कलहातून पत्नी नमिता काकडे यांच्यात वाद होऊन पत्नीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी चिखली शहर पोलीस ठाण्यात विशाल काकडे विरुद्ध 09 नोव्हेंबर रोजी पत्नी नमिता काकडे तिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर विशाल काकडे हा अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहे.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल
मात्र विशाल काकडे याने न्यायालयाच्या परवानगीने नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 13 अ मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशाल काकडे याने न्यायालयीन कोठडीत असताना पोलीस संरक्षणात येऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . चिखली शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा चिखली शहर युवा अध्यक्ष असलेल्या विशाल काकडेला काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर विशाल काकडे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चिखली शहरात खळबळ उडाली आहे.
advertisement
नेमकं काय झालं होतं?
बाहेर मुलींशी अफेअर असल्याच्या मोबाईलमधील मेसेजवरून संशय आल्याने जाब विचारणाऱ्या पत्नीस चिखली युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष विशाल काकडे याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अंगावर पेट्रोल ओतले आणि गॅस सुरू करून साडीचा पदर पेटवून दिला. आरडाओरड करत बाथरुममध्ये जाऊन पत्नीने भडकलेला पदर पाण्याने विझविल्याने अनर्थ टळला. 9 डिसेंबर 2020 रोजी तिचे लग्न विशालसोबत झाले. लग्नाच्या सहा महिन्यांतच सासू रेखा रघुवीर काकडे घरगुती कामांवरून टोमणे मारत मारहाण करत होते. विशालने बॉटलमधील पेट्रोल नमिताच्या अंगावर ओतले आणि गॅस सुरू करून तिचा पदर पेटविला. पेटलेली साडी स्वतः विझवून तिने जीव वाचवला होता. याप्रकरणी पती, सासू व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
November 20, 2025 2:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
अजितदादांचा अजब कारभार! पत्नीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला उमेदवारी जाहीर


