Guess Who : 90s ची फेमस अभिनेत्री, सेटवर झालेली मोलकरीण, जमिनीवर बसून जेवायची
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollyood Actress : 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री सेटवर मोलकरीण बनली होती. जमिनीवर बसून जेवायची.
advertisement
advertisement
एखादा चांगला दिग्दर्शक आपला सिनेमा उत्तम करण्यासाठी त्यावर प्रचंड मेहनत घेत असतो. कलाकारांनाही ते चित्रपटासाठी मेहनत घ्यायला सांगतात. कलाकार साकारत असलेल्या पात्राला ते योग्य न्याय कसा देतील यासाठी ते प्रयत्नशील असतात. अभिनेत्री शबाना आझमी यांच्यामते दिवंगत फिल्ममेकर श्याम बेनेगल हे त्यापैकीच एक. दिग्दर्शक म्हणून त्यांची काम करण्याची वेगळी पद्धत होती. श्याम बेनेगल यांच्या 'अंकुर' या चित्रपटाच्या माध्यमातून शबाना आझमी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
advertisement
शबाना आझमी श्याम बेनेगल यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगताना म्हणाल्या,"श्याम बेनेगल खूप चांगले, प्रेमळ आणि बुद्धिमान व्यक्ती होते. मी आयुष्यात पहिल्यांदा हैदराबादपासून सुमारे 30 किमी दूर असलेल्या येल्ला रेड्डी गुडा गावात गेले होते. तिथे गेल्यावर त्यांनी मला सांगितले की तू गावातील महिलांसारखी साडी नेसून इथे फिर, जेणेकरून तू या वातावरणाला सहज आपलंसं करशील".
advertisement
advertisement
शबाना आझमी एक किस्सा शेअर करत म्हणाल्या,"चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माझे काही कॉलेजचे मित्र सेटवर मला भेटायला आले होते. त्यावेळी मी कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी मलाच केला. मी त्यांना सांगितले की, आज तिची सुट्टी आहे". पुढे त्यांनी मला विचारलं,"तू कोण?". यावर मी त्यांना मी इथली मोलकरीण असं उत्तर दिलं. त्यानंतर ते निघून गेले. श्याम बेनेगल हे सगळं तिरप्या नजरेने पाहत होते. मग त्यांनी मला सांगितले, “तू त्या मुलांना विश्वास बसवला की तू मोलकरीण आहेस. आता तू आमच्यासोबत टेबलावर बसून जेवण करू शकतेस".
advertisement


