कपिल शर्माचा The Great Indian Kapil Show 4 लवकरच होणार सुरू, कोण घेणार भारती सिंहची जागा?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
The Great Indian Kapil Show 4 : कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा'चा आगामी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याने नुकतंच या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
The Great Indian Kapil Show 4 : कॉमेडियन कपिल शर्मा नेहमीच आपल्या विनोदाने चाहत्यांना हसवत असतो. त्यांची कॉमिक टायमिंग इतकी जबरदस्त आहे की प्रत्येकजण हसायल्याशिवाय राहत नाही. कपिल शर्मा आपल्या शोमुळे नेहमीच चर्चेत असतो. नेटफ्लिक्सवरील त्याच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चे तीन सीझन आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. चाहत्यांना आता चौथ्या सीझनची प्रतीक्षा आहे. पण चाहत्यांची ही आतुरता लवकरच संपणार आहे. कारण कपिल शर्माने 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा 4'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
कपिल शर्माने द ग्रेट इंडियन कपिल शोच्या चौथ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. कपिलची ही नवी पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. चौथ्या सीझनची बातमी समोर येताच चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
कपिल शर्माची पोस्ट काय?
कपिल शर्माने सोशल मीडियावर 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा सीझन 4'शोच्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो सोफ्यावर बसून हसताना दिसत आहेत. फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे,"शूट डे 1, सीझन 4, नेटफ्लिक्स". कपिलची ही पोस्ट पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. या सीझनमध्ये कपिलच्या टीममध्ये कोण-कोण दिसणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारती सिंह प्रेग्नंट असल्याने ती या कार्यक्रमाचा भाग नसेल. त्यामुळे तिच्या जागी कोण दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
advertisement
advertisement
चाहत्यांची प्रतीक्षा शिगेला
view commentsकपिल शर्माच्या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. एकाने चाहत्याने लिहिले आहे,"खूप छान दिसताय पाजी.” दुसऱ्याने विचारले— “कोणत्या चित्रपटाचं प्रमोशन करत आहात सर?” तर आणखी एकाने लिहिले,"फिट आणि छान दिसत आहात कपिल". कपिल शर्मा सध्या आपल्या आगामी 'किस किस को प्यार करूं 2'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट 5 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2025 2:30 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
कपिल शर्माचा The Great Indian Kapil Show 4 लवकरच होणार सुरू, कोण घेणार भारती सिंहची जागा?


