ताण तणाव प्रत्येकाच्या आयुष्यात असतात केवळ त्याचं स्वरुप आणि कारण वेगळं असू शकतं. मग ते करिअरमधे प्रगती करण्याच्या आणि स्पर्धेत पुढे राहण्याची शर्यत असो किंवा वैयक्तिक जीवनातले ताण. या सगळ्यामुळे, आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी लोक दररोज काही तास जिममधे घाम गाळतात, पण अनेकदा मानसिक आरोग्याकडे लक्ष देत नाहीत.
advertisement
मन आणि मेंदूमधे सततच्या अशांततेमुळे हळूहळू ताण, निद्रानाश आणि चिंता निर्माण होतात. त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. ध्यानधारणा मन आणि मेंदूसाठी रामबाण उपाय ठरु शकते. आंतरिक शांती आणि संतुलनासाठी ध्यान करणं उपयुक्त आहे.
Suryanamaskar : सूर्यनमस्कार करा, वजन होईल कमी, राहाल फिट, जाणून घ्या आणखी फायदे
ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटून बसणं नाही, तर ते आतल्या उर्जेशी जोडण्याचं प्रभावी माध्यम आहे. दिवसातून वीस मिनिटं ध्यान केल्यानं मन, मेंदू आणि संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळते, तसंच शांती मिळते. आयुर्वेदात, ध्यान हे शरीर आणि मनाच्या आरोग्याशी जोडलेलं आहे.
विज्ञानात, ध्यानाला मेंदूचे रीस्टार्ट बटण म्हटलं जातं, यामुळे, मेंदूमधे 'अल्फा' आणि 'थीटा' लहरी उत्सर्जित करते आणि 'ओव्हरक्लॉकिंग' म्हणजेच जास्त विचार करणं थांबवण्याचा प्रयत्न करते.
Lifestyle Tips : खूप वेळ बसून काम करताय ? मग आधी ही माहिती वाचा
ध्यानधारणेचे फायदे -
ध्यान मन आणि शरीरासाठी अनेक प्रकारे आवश्यक आहे. दररोज वीस मिनिटं ध्यान केल्यानं ताण कमी होतो आणि शरीरात कॉर्टिसोल या तणाव संप्रेरकाचं उत्पादन कमी होतं.
ध्यान शरीरातील आनंदी संप्रेरकांचे उत्पादन वाढवतं आणि सकारात्मक विचार आणि आनंदावर लक्ष केंद्रित करतं.
दुसरे म्हणजे, स्मरणशक्ती मजबूत करते. विसरणं ही एक सामान्य समस्या आहे. गर्भधारणेदरम्यान आणि नंतर महिलांमधे विसरणं अधिक सामान्य आहे आणि हे हार्मोनल असंतुलनामुळे होतं. अशावेळी, ध्यानामुळे स्मरणशक्ती सुधारणं आणि शिकण्याची क्षमता वाढवण्यास मदत करतं.
ध्यानामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करते. दररोज ध्यान केल्यानं आजाराचा धोका कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारतं.
तिसरी गोष्ट म्हणजे गाढ आणि चांगली झोप. दिवसभर काम करणं आणि फोनचा वापर यामुळे झोपेची समस्या उद्भवू शकते. ध्यान केल्यानं मेलाटोनिन, झोपेचा संप्रेरक तयार होण्यास मदत होते, यामुळे गाढ आणि शांत झोप लागते. याव्यतिरिक्त, ध्यान नियमित केल्यानं पेशींची योग्य दुरुस्ती होते.
