डायबिटीसची लक्षणं
- अचानकपणे खूप तहान लागणे.
- नेहमीपेक्षा लघवी होण्याचं प्रमाण आणि वारंवारता वाढणं.
- रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला होणं.
- कमी श्रमाचं काम करूनही थकल्यासारखं वाटणं.
- अचानकपणे वजन कमी होणं.
- नजर कमी होऊन दृष्टीदोष निर्माण होणं.
- एखादी जखमा लवकर भरून न येणं.
ही डायबिटीसची काही प्रमुख लक्षणं. त्यामुळे तुम्हालाही असा त्रास सुरू झाला तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डायबिटीस झाल्यानंतर काळजी घेण्यापेक्षा डायबिटीस होऊ नये म्हणून काळजी घेणं फार महत्त्वाचं ठरतं. कारण डायबिटीसचा थेट परिणाम हा हृदय, किडनी, डोळ्यांवर होण्याची भीती असते.
advertisement
डायबिटीसमुळे विविध त्वचाविकारांचाही सामना करावा लागू शकतो. आधी सांगितल्याप्रमाणे अनेक तरूणांना कल्पनाच नाहीये की, त्यांना डायबिटीसचा विळखा पडू लागलाय. त्यामुळे 35 वर्षे झाल्यानंतर नियमितपणे आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
डायबिटीसमुळे व्यक्तीच्या खाण्यावर अनेक निर्बंध येतात. त्यामुळे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना त्यांचा हिरमोड होऊ शकतो. म्हणूनच डायबिटीस होऊ नये किंवा प्री डायबेटीक रूग्णांसाठी पिस्ता हा सुकामेवा वरदान ठरू शकतो. काहीही खाण्याच्या अर्धा तास आधी जर पिस्ता खाल्ला तर तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात येऊ शकतं असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.
सकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणापूर्वी तुम्ही अर्धा तास पिस्ता खाल्ल्यास तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात राहू शकते. इतकंच काय जर तुम्ही प्री-डायबेटीक असाल तर तुमचा हा आजारही दूर होऊ शकतो. कारण पिस्त्यामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन अन्न पचायला मदत होते. फायबर्समुळे पोट भरलेलं राहिल्याने भूक कमी लागते.
जाणून घेऊयात जेवणापूर्वी पिस्ता खाण्याचे फायदे
लठ्ठपणा आणि कोलेस्टेरॉलही कमी होतो
पिस्त्याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहायला मदत होते. यामुळे ट्रायग्लिसराइड्सही कमी होतात. ज्यामुळे फॅट्स बर्न होऊन अतिरिक्त चरबी जळायला मदत होते. त्यामुळे कंबरेचा घेर आणि वाढलेलं पोट कमी व्हायला मदत होते.
पिस्त्यामुळे असा दूर होतो डायबिटीस
या अभ्यासात 30 ते 65 वयोगटातील व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. डॉ. शिल्पा एन. भूपतीराजू, हार्वर्ड टीएच चॅन स्कूलच्या पोषण विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक म्हणतात की, जेव्हा तुम्ही प्रथिने आणि निरोगी चरबीचे सेवन कराल तेव्हा कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण आपोआप कमी होतं. भारतातले अनेक लोक कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात खातात. ज्याचं रूपांतर उर्जेत होऊन रक्तातली साखर वाढण्याची भीती असते. त्यामुळे जेवणापूर्वी पिस्ता खाल्ला तर शरीराला प्रथिनं मिळतात. फायबर्समुळे अन्न पचायला मदत होऊन पोट भरलेलं राहतं. शिवाय पिस्त्यात असलेल्या हेल्दी फॅट्स आणि पॉलीफेनॉल अनेक संभाव्य रोगांचा धोका कमी होतो.
पिस्त्याच्या ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे जेवणापूर्वी पिस्ता खाल्याने रक्तातली साखर वाढत नाही. भारतातल्या अनेक नागरिकांना जेवताना जास्त खाण्याची म्हणजे (Over Eating) ची सवय झालीये. त्यामुळे काही खाण्यापूर्वी अर्धातास आधी पिस्ता खाल्ला तर पोटही भरलेलं राहिल्यामुळे कमी भूक लागून प्री-डायबेटीक हा आजार कायमचा दूर होऊ शकतो.