आई नऊ महिने बाळाला तिच्या गर्भाशयात ठेवते. बाळाचा विकास गर्भाशयात होतो. निसर्गाने एका मुलाच्या वाढीसाठी स्त्रीच्या गर्भाशयात पुरेशी जागा केली आहे. पण कधीकधी दोन मुलंदेखील जन्माला येतात. यात काही अडचण येते पण एक सशक्त आईमध्ये तिच्या दोन्ही मुलांना गर्भाशयात वाढवण्याइतकी शक्ती असते. पण जर ही संख्या तीन किंवा चार झाली तर? अशी अनेक प्रकरणे आहेत जिथं एका आईला तीन, चार मुलं झाली आहेत. या परिस्थितीत महिलेला खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं. अशीच ही प्रेग्नंट महिला आहे.
advertisement
OMG! गर्भातील बाळाने आपल्याच भावंडांना 'खाल्लं', सोनोग्राफी रिपोर्ट पाहून डॉक्टरही धक्क्यात
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता महिला दरवाजा उघडून आत येते. पण तिला साधं चालतानाही त्रास होत आहे. तिला तिचा तोलही सावरत नाही आहे. तिचं पोट अगदी फुग्यासारखं फुगलं आहे. डॉक्टरांनी महिलेची सोनाग्राफी केली असता तिच्या पोटाच चार मुलं वाढत असल्याचं दिसलं. ही दुर्मिळ स्थिती पाहून डॉक्टरही थक्क झाले.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, एकाच वेळी चार बाळांची गर्भधारणा अत्यंत दुर्मिळ आहे. अमेरिकन प्रेग्नन्सी असोसिएशनच्या मते, अशी शक्यता अंदाजे 70 दशलक्षांपैकी एक आहे.
अशा परिस्थितीत आई आणि मुलं दोघांसाठीही धोका वाढतो कारण गर्भाशयात अनेक गर्भ असल्याने पोषण आणि जागेचा अभाव निर्माण होऊ शकतो.अशा गर्भधारणेत अकाली प्रसूती आणि कमी वजनाच्या बाळांचा जन्म सामान्य आहे. डॉक्टरांनी सांगितले की अशा परिस्थितीत गर्भवती महिलेला विशेष वैद्यकीय सेवा आणि नियमित देखरेखीची आवश्यकता असते. या प्रकरणात देखील डॉक्टरांनी महिलेला विशेष काळजी घेण्याचा आणि बेड विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
Pregnancy News : प्रेग्नंट महिलेचा मृत्यू, डॉक्टरांनी तसाच ठेवला मृतदेह, पुढे जे घडलं ते...
@snugglewash पोस्ट केलेला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियावरील लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युझर्सनी महिलेला चार मुलांची आई झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे, तर काहींनी या दुर्मिळ परिस्थितीबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. काही युझर्सनी चिंता व्यक्त केली आहे. तुमची यावरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीने याची पडताळणी केलेली नाही.)