या शॉपमध्ये प्युअर कॉटन कुर्ते फक्त 650 पासून सुरू होतात, जे ऑफिसला घालण्यासाठी परफेक्ट आहेत. याशिवाय 2 पीस सेट 1200 पासून उपलब्ध असून, यामध्ये काही ड्रेसवर थ्रेडवर्क आणि सुबक एम्ब्रॉयडरी देखील केलेली आहे. खास एम्ब्रॉयडरी केलेले आणि युनिक कलरमध्ये असलेले 2 पीस ड्रेस सेट 1450 मध्ये मिळतात जे दिसायला खास आणि घालायला खूपच आरामदायक आहेत.
advertisement
फॅन्सी पार्टी वेअर किंवा सणासाठी काहीतरी खास हवं असेल, तर येथे चंदेरी सिल्कचे थ्री पीस सेट 1850 मध्ये मिळतात. याशिवाय हलकंफुलकं पण एलिगंट लूक देणारे टिश्यू लिननचे ड्रेस मटेरियल्स सुद्धा या दुकानात मिळतात. आणि 31 ऑगस्ट पर्यंत यांच्याकडे मान्सून सेल सुरू असणार आहे. सगळ्या ड्रेसेस वर 10 टक्के डिस्काउंट आहे.
दुकान मंगळवार ते रविवार दरम्यान सकाळपासून संध्याकाळपर्यंत उघडे असते. सोमवारी दुकान बंद असते. तुम्ही जर कपड्यांमध्ये चॉईस, क्वालिटी आणि बजेट या तिन्ही गोष्टी शोधत असाल, तर दादरमधील या शॉपला एकदा तरी भेट द्या. इथे एकाच छताखाली तुम्हाला ऑफिस वेअरपासून ते पारंपरिक आणि ट्रेंडी ड्रेस मटेरियल्सपर्यंत सर्व काही मिळेल तेही अगदी वाजवी दरात.