Women Success Story: पतीच्या निधनानंतर ती खचली नाही, सुरू केला हँडमेड व्यवसाय, नाशिकच्या अपर्णा यांची कहाणी, Video

Last Updated:

Women Success Story: जवळील व्यक्ती अचानक सोडून गेल्याने नाशिकमधील अपर्णा धामणे या महिलेला एक मानसिक धक्काच बसला. परंतु यातून बाहेर निघण्यासाठी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

+
News18

News18

नाशिक: एक वर्षापूर्वी पतीचे अचानक निधन झाले. जवळील व्यक्ती अचानक सोडून गेल्याने नाशिकमधील अपर्णा धामणे या महिलेला एक मानसिक धक्काच बसला. परंतु यातून बाहेर निघण्यासाठी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आपल्या नवऱ्याची आपल्याला कायम सोबत राहावी आणि त्यांचे नाव नेहमी ऐकू यावे याकरता त्यांच्या व्यवसायाला देखील त्यांचेच नाव दिले. आलेली वाईट वेळ आणि परिस्थितीवर मात करत त्यांनी स्वतःला सावरले आणि आज नाशिकमध्ये त्यांनी स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली.
कुणाच्याही वाट्याला दुःख सांगून येत नसतेत्याचप्रमाणे नाशिकमधील अपर्णा धामणे यांना देखील अशाच प्रसंगाला सामोरे जावे लागले. अपर्णा मूळच्या नाशिकच्या परंतु लग्नानंतर त्या नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात वास्तव्य करत होत्या आणि त्याच ठिकाणी एका कंपनीत अकाउंटंट म्हणून नोकरी देखील करत होत्या. सर्व काही सुरळीत सुखी संसार सुरू असताना अचानक 16 मार्च 2023 ला त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा काळ दिवस उजाडला.
advertisement
त्या दिवशी अपर्णा यांच्या सुखी संसाराला जणू नजरच लागली. या दिवशी अपर्णा यांच्या पतीचे अचानकच दुर्दैवी निधन झाले आणि त्या पूर्णपणे एकट्या पडल्यानवऱ्याचे अचानक जाणे हे त्यांना कुठेतरी कल्पनेच्या पलीकडचे होते. त्यांना हे दुःख सहन होत नव्हते. अचानक मिळालेल्या या धक्क्यामुळे अपर्णा या संपूर्ण खचून गेल्यात्यांची मानसिक स्थिती सर्वस्वी विस्कटून गेली. काय होत आहे काय नाही हे समजत नव्हते. त्याच दरम्यान त्यांना एक आजार झाल्याचे त्यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले
advertisement
संपूर्ण शरीराचा एक भाग निकामी झाला. स्वतःचे मन स्वतःच्या ताब्यात नसल्याने अनेक अडचणी येत गेल्या. त्या वेळी त्या आपल्या माहेरी नाशिक येथे आल्याबरेच औषधोपचार त्यांना घ्यावे लागले. तरी देखील त्या दुःख विसरू शकत नाहीत हे त्यांच्या घरच्या मंडळींना समजले. आपली मुलगी कुठेतरी अडकून  राहता तिचे दुःख कमी होईल याकरता आई आणि भावाने मिळून मदत केली.
advertisement
भावाचे आधीपासून शोभेच्या वस्तू बनवण्याचा छंद होता आणि अपर्णा देखील आधीपासून कला क्षेत्रात असल्याने घरच्यांनी त्यांना हँडमेड वस्तूंचे दुकान सुरू करून दिले. ज्यामुळे त्या इतरांशी गप्पा मारतील आणि आनंदी राहतील. त्यांनी देखील व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
आपले पती आपल्यासोबत नाहीत परंतु त्यांचा सहवास आणि त्यांचे नाव नेहमी ऐकू यावे याकरता त्यांनी आपल्या या दुकानाला देखील वैभव आर्ट्स असे नाव दिले. आज अपर्णा या एक वर्षापासून आपले हे दुकान सांभाळत असतात. त्या त्यांच्या हाताने या दुकानातील सर्व वस्तू बनवून विक्री करत असतातइतक्या मोठ्या दुःखाचा डोंगर सावरून आज त्या नाशिकमध्ये आपल्या या कामामुळे ओळखल्या जात आहेत. तुम्हाला देखील यांच्या या वस्तू बघायच्या असतील तर तुम्ही देखील त्यांना भेट देऊ शकता.
मराठी बातम्या/मनी/
Women Success Story: पतीच्या निधनानंतर ती खचली नाही, सुरू केला हँडमेड व्यवसाय, नाशिकच्या अपर्णा यांची कहाणी, Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement