Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, जोगेश्वरीतील बिझनेस पार्कचे तीन मजल जळून खाक, पाहा PHOTO

Last Updated:

Jogeshwari Fire : मुंबईतील जोगेश्वरी परिसरात आज सकाळी भीषण आग लागली. जे.एन.एस. बिझनेस सेंटर इमारतीच्या तीन मजल्यांना आगीने वेढले असून ते पूर्णतः जळून खाक झाले आहेत. घटनेनंतर परिसरात धुराचे लोट पसरले असून बचावकार्य सुरू आहे

News18
News18
जोगेश्वरी परिसरात आज सकाळी भीषण आगीची घटना घडली आहे. जोगेश्वरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील बेह्रमपाडा परिसरात असलेल्या जे.एन.एस. बिझनेस सेंटर या उंच इमारतीत आज सकाळी अचानक आग लागली.
ही घटना सकाळी सुमारे 10.51 वाजता घडल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत आगीचा फैलाव झाला असून, इमारतीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दाट धुराचे लोट दिसत आहेत. आगीच्या धुरामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून, काही रस्ते तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.
advertisement
या आगीत काही लोक इमारतीत अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान, पोलिस अधिकारी, तसेच स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी बचावकार्य करत आहेत. बचावकार्य सुरळीत पार पडावे म्हणून घटनास्थळी 108 अॅम्ब्युलन्स सेवा, बीएमसीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि वीज वितरण कंपनीचे कर्मचारी कार्यरत आहेत.
advertisement
सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किट झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
धुराचे प्रचंड लोट आणि वाढत चाललेली आग पाहून परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र आगीमुळे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या अद्यापही घटनास्थळी असून आग पूर्णपणे विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, जोगेश्वरीतील बिझनेस पार्कचे तीन मजल जळून खाक, पाहा PHOTO
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement