माजी नगरसेवकांची दिवळी धडाक्यात, महापालिकेकडून पैशांचा पाऊस, कोट्यवधींची कामं मंजूर

Last Updated:

नवी मुंबई महानगरपालिकेनं मात्र माजी नगरसेवकांवर पैशांचा पाऊस पाडला आहे. महापालिकेने माजी नगरसेवकांची कोट्यवधी रुपयांची कामं मंजूर केली आहेत.

News18
News18
विनय म्हात्रे, प्रतिनिधी नवी मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. कोणत्याही क्षणी राज्यात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि आगामी निवडणुका या दोन्ही बाबींमुळे सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. दिवाळीआधी नुकसान भरपाई देऊ, असं सरकारने काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. पण अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.
अशी एकूण स्थिती असताना आता नवी मुंबई महानगरपालिकेनं मात्र माजी नगरसेवकांवर पैशांचा पाऊस पाडला आहे. महापालिकेने माजी नगरसेवकांची कोट्यवधी रुपयांची कामं मंजूर केली आहेत. एकीकडे शेतकरी वर्ग अद्याप मदतीसाठी आस लावून बसला नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नगरसेवकांची दिवाळी एकप्रकारे धडाक्यात साजरी झाली आहे.
नवी मुंबईचे महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या निर्णयामुळे माजी नगरसेवकांची दिवाळी गोड झाली आहे. आयुक्तांनी प्रत्येक माजी नगरसेवकांची दोन ते तीन कोटींची कामे मंजूर केली आहेत. यात भाजप नगरसेवकांची १२५ ते १५० कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची २५० ते ३०० कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
advertisement
दुसऱ्या बाजुला इतर सर्व पक्षांच्या माजी नगरसेवकांना देखील खूश करण्यात आलं आहे. निवडणुका तोंडावर आल्या असताना माजी नगरसेवकांसाठी कोट्यवधींची खैरात वाटल्याने या निर्णयाकडे राजकीय अंगाने बघितलं जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माजी नगरसेवकांची दिवळी धडाक्यात, महापालिकेकडून पैशांचा पाऊस, कोट्यवधींची कामं मंजूर
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement