तुमच्या ट्रॅक्टरला जास्त इंधन लागतेय का? मग या उपाययोजना करा, पैशांची होईल बचत

Last Updated:

Tractor News : शेती ही आजही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते आणि ट्रॅक्टर हा त्या शेतीचा प्रमुख साथीदार आहे. मात्र सध्या डिझेलचे वाढते दर आणि ट्रॅक्टरचे वाढते इंधन खर्च हे शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत.

tractor news
tractor news
मुंबई : शेती ही आजही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते आणि ट्रॅक्टर हा त्या शेतीचा प्रमुख साथीदार आहे. मात्र सध्या डिझेलचे वाढते दर आणि ट्रॅक्टरचे वाढते इंधन खर्च हे शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी इंधनावर होणारा अतिरिक्त खर्च शेतीचा नफा कमी करतो. पण योग्य देखभाल आणि काही सोप्या उपाययोजना केल्यास ट्रॅक्टरचे इंधन खर्च १५ ते २० टक्क्यांनी कमी करता येऊ शकतात. चला जाणून घेऊया, ते उपाय कोणते आहेत.
advertisement
इंजिनची नियमित तपासणी करा
ट्रॅक्टरचं इंजिन हे त्याचं हृदय असतं. इंजिनची योग्य निगा राखली नाही तर ते जास्त डिझेल खर्च करतं. त्यामुळे दर महिन्याला इंजिन ऑइल, एअर फिल्टर आणि फ्युएल फिल्टर तपासून घ्या. एअर फिल्टर बंद झाल्यास इंधन योग्यरीत्या जळत नाही आणि त्यामुळे खर्च वाढतो. वेळेवर ऑइल बदलणे आणि फिल्टर स्वच्छ ठेवणे हे इंधन बचतीचे पहिले पाऊल आहे.
advertisement
योग्य गिअर आणि वेग वापरा
अनेक शेतकरी काम करताना चुकीच्या गिअरमध्ये ट्रॅक्टर चालवतात. उदाहरणार्थ, हलक्या कामासाठी मोठा गिअर वापरल्यास इंजिनवर अनावश्यक ताण येतो आणि डिझेल जास्त खर्च होते. त्यामुळे कामाच्या स्वरूपानुसार गिअर आणि वेग ठरवणे आवश्यक आहे. मध्यम वेगात ट्रॅक्टर चालवल्यास इंधनाचा वापर कमी होतो आणि इंजिनचे आयुष्यही वाढते.
advertisement
टायरचा हवेचा दाब योग्य ठेवा
ट्रॅक्टरच्या टायरमध्ये हवेचा दाब कमी असेल तर गाडीला जास्त शक्ती लागते आणि परिणामी डिझेलचा वापर वाढतो. त्यामुळे दर आठवड्याला टायर प्रेशर तपासून योग्य प्रमाणात हवा भरावी. तसेच, जास्त ओझं घेऊन ट्रॅक्टर चालवणे टाळावे.
advertisement
योग्य नांगरणी आणि साधनांचा वापर करा
ट्रॅक्टरला जोडलेली शेतीची अवजारे जड किंवा विसंगत असल्यास इंजिनवर जास्त भार पडतो. त्यामुळे नेहमी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य आकाराचे नांगर, हॅरो, रोटाव्हेटर किंवा सिड ड्रिल वापरावेत. आधुनिक आणि हलक्या वजनाच्या उपकरणांचा वापर केल्यास इंधन बचत होते आणि कामही जलद पार पडते.
advertisement
ट्रॅक्टरचा ओव्हरलोड वापर टाळा
बर्‍याचदा शेतकरी ट्रॅक्टरचा वापर माल वाहतुकीसाठी किंवा जड कामांसाठी जास्त प्रमाणात करतात. हे इंजिनच्या क्षमतेबाहेरचं काम असल्याने इंधन खर्च झपाट्याने वाढतो. ओव्हरलोड केल्यास इंजिनचे नुकसान होण्याची शक्यताही असते.
डिझेलची गुणवत्ता तपासा
advertisement
कमी दर्जाच्या डिझेलमुळे इंजिनची कार्यक्षमता कमी होते आणि धूर व इंधन खर्च वाढतो. नेहमी विश्वासार्ह पेट्रोलपंपावरूनच इंधन भरा आणि ड्रममध्ये साठवलेले जुने डिझेल वापरणे टाळा.
आधुनिक ट्रॅक्टर आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर
आजकाल बाजारात ‘फ्युएल एफिशियंटट्रॅक्टर आणि सेन्सर आधारित मॉडेल्स उपलब्ध आहेत. हे ट्रॅक्टर कामाच्या प्रकारानुसार इंधन पुरवठा नियंत्रित करतात, ज्यामुळे १० ते १५ टक्क्यांपर्यंत बचत होते.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
तुमच्या ट्रॅक्टरला जास्त इंधन लागतेय का? मग या उपाययोजना करा, पैशांची होईल बचत
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement