अमरावती: दिवाळी म्हणजे प्रकाश, उत्साह आणि चमचमीत खाद्यपदार्थांचा सण. मात्र, या काळात जास्त तेलकट, तिखट, गोड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने अनेकजणांना पोटाचे त्रास सुरू होतात. ॲसिडिटी, पोट दुखणे, बद्धकोष्ठता आणि बरेच त्रास होतात. हा त्रास वाढल्यास अनेकदा आपण घरीच डॉक्टरांचा सल्ला न घेता गोळ्या घेतो. पण, त्या गोळ्या सुद्धा नेहमी घेणे शरीरासाठी हानिकारक आहे. म्हणून आधीच काळजी घेऊन आजार टाळणे कधीही बरे.