Maharashtra Talathi Bharti : खुशखबर! राज्यात 1700 तलाठी पदे भरणार, अर्ज करण्याची नेमकी तारीख काय?
Last Updated:
Talathi Recruitment : महाराष्ट्रात तब्बल 1700 तलाठी पदे भरणार आहेत. अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून अर्जासाठी नेमकी तारीख आणि पात्रता तपासणे महत्त्वाचे आहे. ही संधी गमवू नका.
सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे, कारण महाराष्ट्रात महसूल विभागाने 1700 तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली असून त्यामुळे राज्यातील तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
ही भरती एकूण 4,644 पदांसह राज्यभरातील 36 जिल्ह्यांमध्ये होणार आहे. अधिकृत अधिसूचना आणि अर्ज प्रक्रिया डिसेंबर 2025 पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. महसूल सेवकांसाठी काही राखीव जागा ठेवण्याची आणि विभागात अनुभवावर आधारित अतिरिक्त गुण मिळवण्याची चर्चा सुरू आहे.
तलाठी ही पदे ग्रामीण भागातील महसूल आणि जमीन नोंदीसाठी महत्त्वाची आहेत. काही जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांमुळे कामकाजावर परिणाम होत होता, त्यामुळे ही भरती अत्यंत गरजेची ठरली आहे. तलाठी भरती ग्रुप-सी अंतर्गत येईल आणि महाराष्ट्रातील सहा महसूल विभागांमध्ये पदे वितरीत केली जातील जे की मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर असे असतील.
advertisement
अशी असेल पात्रता
उमेदवाराने पदवीधर असणे आवश्यक आहे आणि MSCIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र आवश्यक आहे. वयमर्यादा 18 ते 38 वर्षे असून आरक्षणानुसार सवलत मिळेल. परीक्षा कॉम्प्युटर आधारित टेस्ट (CBT) स्वरूपात होईल, ज्यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी यांचा समावेश असेल.
महसूल सेवकांसाठी राखीव संधी दिल्या जातील आणि त्यांच्या अनुभवानुसार अतिरिक्त गुण मिळतील. महसूल सेवक संघटनेच्या मागण्यांनुसार मानधनाऐवजी नियमित वेतन मिळावे असा प्रस्ताव पूर्ण होत नसला तरी अनुभवावर आधारित प्राधान्य दिले जाणार आहे.
advertisement
भरती प्रक्रिया कशी असेल?
view commentsअधिकृत सूचना mahabhumi.gov.in वेबसाइटवर डिसेंबर 2025 पर्यंत येण्याची शक्यता आहे. अर्ज ऑनलाइन करता येईल तसेच यासाठीचे शुल्क 350 ते 500 रुपयांपर्यंत असतील.महत्त्वाचे म्हणजे अर्ज कालावधी सप्टेंबर-नोव्हेंबर 2025 दरम्यान असेल. परीक्षा TCS द्वारे CBT स्वरूपात होऊन ती 2 तासांची होईल. परीक्षेत चुकीच्या उत्तरांवर 1/4 गुण वजा केले जातील. परीक्षेत मराठीसाठी 25, इंग्रजीसाठी 25, सामान्य ज्ञानासाठी 40 आणि बुद्धिमत्तेसाठी 10 गुण असतील. निवड ही लेखी परीक्षा आणि कागदपत्रांची तपासणी यावर आधारित होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 23, 2025 1:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Talathi Bharti : खुशखबर! राज्यात 1700 तलाठी पदे भरणार, अर्ज करण्याची नेमकी तारीख काय?