TRENDING:

Women Health : स्त्रियांच्या आरोग्यासाठी गुणकारी शतावरी, जाणून घेऊया आयुर्वेदिक औषधी वनस्पती शतावरीचे फायदे

Last Updated:

आयुर्वेदानुसार, शतावरीमुळे तब्येत सशक्त राहते आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठीही शतावरीचा उपयोग होतो. यामुळे मासिक पाळी संबंधित समस्या, जसं की पोटदुखी आणि पोटात गोळे येणं, यांपासून आराम मिळू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महिलांसाठी शतावरी अत्यंत गुणकारी आहे. महिलांच्या संपूर्ण आरोग्यासाठी शतावरी औषधी हा चांगला पर्याय आहे. शतावरीला queen of herbs म्हटलं जातं.
News18
News18
advertisement

आयुर्वेदात शरीराला नैसर्गिकरित्या सशक्त करणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींची माहिती आहे. शतावरी ही त्यापैकीच एक औषधी वनस्पती. शतावरी ही एक औषधी वनस्पती असून, तिच्या मुळांचा उपयोग औषधोपचारात केला जातो.

आयुर्वेदानुसार, शतावरीमुळे तब्येत तंदुरुस्त राहते आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठीही शतावरीचा उपयोग होतो. यामुळे मासिक पाळी संबंधित समस्या, जसं की पोटदुखी आणि पोटात गोळे येणं, यांपासून आराम मिळू शकतो.

advertisement

Health Tip : सतत बसून काम केल्यामुळे वाढतंय सांध्यांचं वय, जाणून घेऊया सांध्यांच्या आरोग्यासाठी दररोज हालचाल का आहे आवश्यक?

आयुर्वेदात, प्रजनन आरोग्यासाठी शतावरी फायदेशीर आहे. गर्भधारणेच्या तयारीदरम्यान अनेक जण शतावरी घेतात, कारण त्यामुळे शरीराचं पोषण होण्यास मदत होते.

स्तनपान करणाऱ्या मातांसाठी फायदेशीर - शतावरी स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी देखील फायदेशीर मानली जाते. यामुळे स्तनदुग्ध निर्मिती सुधारण्यास मदत होते तसंच शरीराच्या मजबुतीसाठीही शतावरी उपयुक्त आहे.

advertisement

Joints Health : उठताना चढताना बसताना हाडांचा आवाज का येतो ? हे कशाचं लक्षण आहे ? यावर कोणते उपाय करायचे ?

शतावरीला नैसर्गिक टॉनिकही म्हणतात. शतावरीमुळे अशक्तपणा कमी होतो.

पचन आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी - काही तज्ज्ञांच्या मते, शतावरी पचनसंस्थेसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यासही मदत होऊ शकते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

मात्र, कोणत्याही औषधी वनस्पतीचे नियमित सेवन करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Women Health : स्त्रियांच्या आरोग्यासाठी गुणकारी शतावरी, जाणून घेऊया आयुर्वेदिक औषधी वनस्पती शतावरीचे फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल