उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील लक्ष्मीपत सिंघानिया इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड कार्डियाक सर्जरीने हार्ट पेशंटसाठी एक किट तयार केली आहे. या किटचं नाव 'राम किट' आहे. आता प्रश्न असा आहे की राम किट म्हणजे काय? तर या किटमध्ये अशी तीन औषधं आहेत जी हृदयविकाराच्या वेळी रुग्णाला दिली तर त्याचा जीव वाचू शकतो.
advertisement
Heart Attack : काय सांगता! हनुमान चालिसाचे पठण केल्याने हार्ट अटॅक येत नाही
राम किटमध्ये कोणती औषधं आहेत? राम किटमध्ये असलेली औषधं काय आणि कशी काम करतात? हृदयविकाराच्या झटक्यात राम किट कशी प्रभावी आहे? असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस.के. पांडे म्हणाले, 'राम किटमध्ये तीन औषधं समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यात इकोस्प्रिन (रक्त पातळ करणारे), रोसुवास्टॅटिन (कोलेस्ट्रॉल नियंत्रण) आणि सॉर्बिट्रेट (हृदयाच्या चांगल्या कार्यासाठी) यांचा समावेश आहे. डॉक्टरांनी तयार केलेल्या किटमध्ये असलेल्या औषधांमध्ये रक्त पातळ करून, रक्तवाहिन्यांमधील अडथळा उघडून आणि हृदयरोग्यांना जलद आराम देऊन जीव वाचवण्याची क्षमता आहे. त्याची किंमत फक्त 10 रुपये असल्याने, कोणीही हे किट घरी ठेवू शकतो.
Heart Attack : चमत्कारिक पाणी, सकाळी रिकाम्या पोटी प्यायलात तर हार्ट अटॅकचा धोका कमी होईल
राम किटमध्ये असलेली औषधे हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्वरित आराम देण्यासाठी उपयुक्त मानली जातात. ज्यांना आपत्कालीन मदतीची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी हे किट अधिक फायदेशीर ठरेल. हृदयरोग आणि स्ट्रोकचे रुग्ण वाढत असल्याने ते जीव वाचवू शकते. जर एखाद्या व्यक्तीने हृदयविकाराचा झटका किंवा छातीत दुखण्याच्या बाबतीत समस्या असेल तेव्हा ही औषधं घरी घेतली तर यामुळे मृत्यूचा धोका टाळता येतो. औषधे घेतल्यानंतर जवळच्या रुग्णालयात जावं. जेणेकरून रुग्णालयात जाईपर्यंत होणारा मृत्यूचा धोका टाळता येईल. कारण हे किट प्रथमोपचार उपचार म्हणून काम करतं.