मुंबई : रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा वर्षातला मोठा सण असतो. प्रत्येक सणाचे एक खास वैशिष्ट्य असते आणि त्या सणाला आवर्जून एखादा गोड पदार्थ तयार केला जातो. त्याचप्रमाणे ईद म्हणजे शिरखुर्मा हे गणित ठरलेलेच. पारंपरिक पद्धतीने केले जाणार शिरखुर्मा म्हणजे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असे मिष्टान्न. हे मिष्टान्न आपण घरी ही करू शकतो. हा पदार्थ करायला अवघड असतो असा आपला समाज असतो. मात्र योग्य प्रमाणात सगळे पदार्थ घेतले तर हा पारंपारिक शिरखुर्मा करणे काही फार अवघड काम नाही. त्यामुळे शिरखुर्मा कसा बनायचा याचीच रेसिपी आपल्याला मुंबईतील गृहिणी स्मिता कापडणे यांनी सांगितली आहे.
advertisement
शिरखुर्मा बनवण्यासाठी साहित्य
तुप, शेवया, दुध, साखर, मिल्क मेड, काजु, बदाम, मनुके, वेलची आणि फुडकलर हे साहित्य लागेल.
आता उपवासाचं टेन्शन सोडा, ही रेसिपी बनवा अन् वर्षभरात कधीही खावा रताळं, Video
शिरखुर्मा बनवण्यासाठी कृती
प्रथम पातील्यामध्ये तुप घ्यावे. नंतर त्यामध्ये शेवया चांगल्या लालसर भाजुन घ्याव्यात. त्यानंतर काजु, बदाम आणि मनुके असे सर्व ड्राय फ्रुईट्स गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. आणि त्यामध्ये मिल्क मेड घाला. थोडा फुड कलर अॅड करा (चवीनुसार) नंतर त्यामध्ये थोडे पाणी घालुन शेवया परतुन घ्याव्यात. मग त्यामध्ये सुका मेवा आणि साखर घाला आणि गॅस बंद करुन त्यामध्ये दुध अॅड करावे आणि चांगले सर्व मिश्रण एकजीव करून हलवावे. तर आशा प्रकारे आपला शिरखुर्मा तयार झाला.