TRENDING:

Joints Health : उठ बस करताना हाडांचा आवाज येतो का ? आवाज कशामुळे येतो ? समजून घेऊया कारणं आणि उपचार

Last Updated:

बोटं दुमडताना किंवा पायऱ्या चढताना गुडघा किंवा हाडांमधून कटकट असा आवाज येतो. हा आवाज वारंवार येत असेल आणि त्यासोबत वेदना किंवा सूज येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

आजकाल हाडांच्या समस्या सामान्य झाल्या आहेत. बोटं दुमडताना किंवा पायऱ्या चढताना गुडघा किंवा हाडांमधून कटकट असा आवाज येतो. हा आवाज वारंवार येत असेल आणि त्यासोबत वेदना किंवा सूज येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

Teeth Hygiene : दातांवरचा पिवळा थर होईल नाहीसा, स्ट्रॉबेरी वापरण्याच्या या युक्तीनं दात दिसतील पांढरे शुभ्र

advertisement

या आवाजाचं मुख्य कारण म्हणजे सांध्यांमधील सायनोव्हियल फ्लुईड. या द्रवामधे वायूचे लहान बुडबुडे तयार होतात आणि जेव्हा आपण सांध्यांमधे हाडं वाकवतो, तेव्हा निर्माण होणाऱ्या दाबामुळे हे बुडबुडे फुटतात. या फुटण्याच्या प्रक्रियेमुळे तडतडण्याचा किंवा कटकटण्याचा आवाज येतो. जोपर्यंत यासोबत वेदना किंवा सांधे आखडल्याचं जाणवत नाही, तोपर्यंत सहसा यामुळे कोणतंही नुकसान होत नाही.

advertisement

आपली बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि सतत बसून राहणं या सवयींमुळे हाडं मोडण्याचा आवाज येतो.

Ayurveda Tips : आयुर्वेदातील दोषानुसार ठरतं तब्येतीचं गणित, पाहूयात प्रकृती दोषानुसार कसा असावा आहार

हाडं मोडण्याचा आवाज टाळण्यासाठी उपाय:

संतुलित आहार - हाडं आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी योग्य आहार आवश्यक आहे.

गूळ आणि चणे - गूळ आणि भाजलेले चणे कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत आणि यामुळे सांधे मजबूत होतात.

advertisement

भिजवलेले बदाम - भिजवलेल्या  बदामांमधील पोटॅशियम आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड हाडांच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहेत आणि यामुळे हाडांची मजबुती टिकून राहते.

दूध आणि दही - दूध आणि दह्यामधे कॅल्शियम आणि जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतात, यामुळे हाडं मजबूत करण्यास मदत होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दादर स्टेशनचा ‘मानवी इंडिकेटर’, 4 वर्षांपासून नरेंद्र करतात अनोखी सेवा, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक
सर्व पहा

हळद आणि आलं - हळद आणि आल्यामधे दाहशामक गुणधर्म असतात, ज्यामुळे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत होते..

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Joints Health : उठ बस करताना हाडांचा आवाज येतो का ? आवाज कशामुळे येतो ? समजून घेऊया कारणं आणि उपचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल