TRENDING:

Tiredness : पूर्ण झोप झाल्यानंतरही दमल्यासारखं वाटतं ? असं का होतं ? जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपचार

Last Updated:

आपण अनेकदा कामाचा ताण किंवा धावपळ, व्यस्तता यामुळे दुर्लक्ष करतो, पण रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याचं हे एक प्रमुख लक्षण असू शकतं. शरीरातील इन्सुलिन संतुलन बिघडतं तेव्हा पेशींपर्यंत पोहोचण्याऐवजी ग्लुकोज रक्तात जमा होतं. यामुळे पेशींना ऊर्जा मिळत नाही, ज्यामुळे थकवा येतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : रात्रीची झोप झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश वाटतं आणि दिवस उत्साहानं सुरु करता येतो. पण अनेकदा, रात्री सात-आठ तास पूर्ण झोप झाल्यानंतरही, सकाळी उठल्यावर पुन्हा थकवा जाणवतो, किंवा शरीरात दिवसभर ऊर्जा शिल्लक नाही असं होत असेल तर सावध व्हा.
News18
News18
advertisement

आपण अनेकदा कामाचा ताण किंवा धावपळ, व्यस्तता यामुळे दुर्लक्ष करतो, पण रक्तातली साखरेचं प्रमाण वाढण्याचं हे एक प्रमुख लक्षण असू शकतं. शरीरातील इन्सुलिन संतुलन बिघडतं तेव्हा पेशींपर्यंत पोहोचण्याऐवजी ग्लुकोज रक्तात जमा होतं. यामुळे पेशींना ऊर्जा मिळत नाही, ज्यामुळे थकवा येतो.

रक्तातली वाढलेली साखर आणि थकवा यांच्यातील संबंध समजून घेऊया. हायपरग्लायसेमिया किंवा रक्तातली वाढलेली साखर याचा तुमच्या उर्जेच्या पातळीवर थेट परिणाम होतो.

advertisement

Lifestyle disease : तरुणांमधे वाढतंय आजारांचं प्रमाण, आयुष्य गमवू नका, सावध व्हा

पेशींसाठी उर्जेची कमतरता - ग्लुकोज शरीराला ऊर्जा प्रदान करते. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे किंवा त्याच्या प्रतिकारामुळे ग्लुकोज पेशींमधे प्रवेश करू शकत नाही तेव्हा शरीराला थकवा जाणवतो.

निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन - रक्तातली साखरेची पातळी वाढते तेव्हा मूत्रपिंड जास्त प्रमाणात मूत्र तयार करतात जेणेकरून जास्त साखर बाहेर पडेल. जेव्हा शरीरातून द्रवपदार्थ कमी होतात तेव्हा निर्जलीकरण होते, ज्यामुळे थकवा येतो.

advertisement

या लक्षणांकडे दुर्लक्ष नको -

थकव्यासोबत खालील लक्षणं जाणवत असतील तर डॉक्टरांना भेटणं महत्वाचं आहे:

वारंवार तहान लागणं आणि लघवी होणं - नेहमीपेक्षा जास्त तहान लागणं किंवा जास्त वेळा बाथरूममधे जावं लागणं हे रक्तातल्या वाढलेल्या साखरेचं लक्षण आहे.

Minimalism : अनावश्यक गोष्टींचा पसारा आवरा, वाचा मिनिमलिस्ट जगण्याचे मोठे फायदे

advertisement

दृष्टी धूसर होणं– जास्त साखरेमुळे डोळ्याच्या लेन्सचा आकार बदलू शकतो, ज्यामुळे गोष्टी अस्पष्ट होतात.

जखमा बऱ्या होण्यास जास्त वेळ लागतो. किरकोळ दुखापत किंवा ओरखडा बरा होण्यास आठवडे लागत असतील, तर ते वाढलेल्या साखरेचं लक्षण असू शकतं.

अचानक वजन कमी होणं - आहार किंवा व्यायामाशिवाय वजन वेगानं कमी होत असेल तर शरीर उर्जेसाठी स्नायू आणि चरबी जाळण्यास सुरुवात करतं.

advertisement

हात आणि पायांना मुंग्या येणं - नसांवर साखरेचा परिणाम झाल्यामुळे पायांमधे सुन्नपणा जाणवणं किंवा मुंग्या येणं अशी लक्षणं दिसून येतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहतूक कोंडीतून होणार सुटका, पुणे पोलिसांची ट्रॅफिकक्युअर प्रणाली काय? Video
सर्व पहा

ही लक्षणं दिसली तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला त्वरीत घ्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tiredness : पूर्ण झोप झाल्यानंतरही दमल्यासारखं वाटतं ? असं का होतं ? जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल