आपल्या वाईट सवयींचा परिणाम होऊन पाठदुखी वाढू शकते. तसंच आहाराचाही मणक्यावर थेट परिणाम होतो. शिवाय, काही पदार्थांमुळेही पाठदुखी वाढू शकते. न्यूरोस्पाइन सर्जन डॉ. अरुण तुंगारिया यांनी इंस्टाग्राम हँडलवर याबद्दलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. दररोज खाल्लेल्या काही पदार्थांमुळे पाठदुखी आणि पाठीच्या कण्याच्या विकारांचा धोका हळूहळू वाढू शकतो याबद्दलची माहिती व्हिडिओत देण्यात आली आहे.
advertisement
Calcium Deficiency : कॅल्शियमच्या कमतरतेचे शरीर देतं संकेत, हाडं होतील नाजूक, वेळीच घ्या काळजी
या पाठदुखीवर वेळीच उपचार केले तर मणक्याचं आरोग्य सुधारणं शक्य आहे. यासाठी कोणते पदार्थ टाळावेत याची यादी डॉक्टरांनी दिली आहे. पाच पदार्थ कमी करावेत किंवा पूर्णपणे टाळावेत असा सल्ला त्यांनी दिला आहे.
जास्त साखर - प्रत्येकाला गोड पदार्थ आवडतात, पण जास्त साखरेमुळे हाडं आणि पाठीचा कणा कमकुवत होतो. त्यामुळे शरीरात जळजळ वाढते, ज्यामुळे पाठदुखी आणखी वाढते. पाठदुखीचा त्रास होत असेल तर साखरयुक्त पदार्थ टाळा.
जास्त मीठ - जास्त मीठ शरीरातील कॅल्शियम बाहेर काढतं. हाडं मजबूत राखण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. म्हणून, मीठ जास्त असलेले पॅकेज केलेले पदार्थ किंवा चिप्स खाणं टाळा. जेवणातही मीठ कमी प्रमाणात घाला.
रिफाइंड पीठ - पिझ्झा, बर्गर, समोसे किंवा बिस्किटं यांसारखे रिफाइंड पीठाचे पदार्थ शरीरात जळजळ वाढवतात. ही जळजळ मणक्याच्या आणि डिस्कवर परिणाम करते, ज्यामुळे वेदना वाढतात. त्याऐवजी मल्टीग्रेन पीठ, ओट्स किंवा बार्ली वापरणं चांगलं.
तळलेले पदार्थ - तळलेल्या पदार्थानं वजन वाढतं तसंच चरबी जमा होते. ज्यामुळे मणक्यावर अतिरिक्त दबाव येतो. या पदार्थांमुळे जळजळ देखील वाढते. तळलेल्या पदार्थांपेक्षा भाजलेले, ग्रील्ड किंवा वाफवलेले पदार्थ पसंत करा.
रेड मीट - यात प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण जास्त असतं. स्पाइनल डिस्कच्या आरोग्यासाठी, म्हणजेच मणक्यांमधल्या गादीसाठी हे फॅट हानिकारक असतं. जास्त प्रमाणात खाल्ल्यानं पाठदुखी आणि पाठीच्या कण्याच्या समस्या देखील वाढू शकतात.
पाठदुखी कशी कमी करावी यासाठी डॉक्टरांनी दिलेल्य टिप्स नक्की लक्षात ठेवा -
पाठदुखी टाळायची असेल, तर पहिले पाऊल म्हणजे निरोगी जीवनशैली निवडणे.
नियमितपणे हलका व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या."
ताजी फळे, हिरव्या भाज्या आणि कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध आहारामुळे पाठीचा कणा मजबूत होतो.
या सोप्या गोष्टींकडे लक्ष देऊन, तुम्ही औषधांशिवाय पाठदुखीपासून आराम मिळवू शकता.