भारत देशात वर्षातील बहुतांश काळ मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो. तरीही, बहुतेक भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. हे धक्कादायक सत्य आहे.
ज्या देशात सूर्यप्रकाशाची कमतरता नाही अशा देशात लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने का ग्रस्त आहेत? त्याची अनेक कारणं आहेत.
मेलेनिन - भारतीयांची त्वचा नैसर्गिकरित्या गव्हाळ किंवा गडद रंगाची असते. आपल्या त्वचेमधे मेलेनिन नावाचं रंगद्रव्य जास्त प्रमाणात असतं. मेलेनिन सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षणात्मक कवच म्हणून काम करतं, त्वचेला जळण्यापासून रोखतं, पण ते व्हिटॅमिन डीचं उत्पादन कमी करतं.
advertisement
Summer Care : उन्हाळ्यात घ्या तब्येतीची काळजी, उन्हाळा सुसह्य करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
दुसरा मुद्दा म्हणजे बदलती जीवनशैली - आजची बहुतेक लोकसंख्या घरातच राहते. सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत डेस्क जॉब, बंद ऑफिस आणि वातानुकूलित खोल्या यामुळे आपण सूर्यापासून दूर राहतो. शहरी भागात उंच इमारती थेट सूर्यप्रकाश घरांपर्यंत पोहोचू देत नाहीत.
तिसरं म्हणजे प्रदूषण - महानगरांमधे वाढतं वायू प्रदूषण हा देखील एक प्रमुख घटक आहे. हवेतील धुळीचे कण आणि धूर सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांना आपल्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखतात, ज्यामुळे व्हिटॅमिन डीचे उत्पादन रोखलं जातं.
आहारातील बदल - आहारात व्हिटॅमिन डीचे नैसर्गिक स्रोत खूप मर्यादित आहेत, चरबीयुक्त मासे, अंड्याचा पिवळा भाग आणि दुग्धजन्य पदार्थ. भारतातील मोठी लोकसंख्या शाकाहारी आहे.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणं -
हाडं आणि सांध्यांमधे सतत वेदना
सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणं
स्नायूंचा ताण
नैराश्य किंवा चिडचिड
वारंवार आजारी पडणं
Bloating : उन्हाळ्यात पोटाच्या समस्या टाळण्यासाठी महत्त्वाचा सल्ला, घरगुती उपायांनी करा मात
'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेवर उपाय -
सूर्यप्रकाशासाठी योग्य वेळ: सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत किमान पंधरा-वीस मिनिटं उन्हात घालवा. या काळात अतिनील किरणं सर्वात प्रभावी असतात.
आहारातील बदल: आहारात मशरूम, फोर्टिफाइड दूध, दही आणि चीज समाविष्ट करा.
पूरक आहार: सतत थकवा जाणवत असेल तर रक्त तपासणी करा. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेण्यानं या जीवनसत्वाची कमतरता भरून निघू शकते.
