मुंबई: छठपूजा हा बिहारमधला मोठा सण असतो. या पुजेसाठी एक खास प्रसादही बनवला जातो. ठेकुआ हा पदार्थ खास छठ पुजेसाठी बनवला जातो. पुजा ठेकुआ या पदार्थाशिवाय अपूर्ण मानली जाते. ठेकुआला खजुरिया, टिकारी आणि ठोकनी असेही म्हणतात. ही भारतीय उपखंडातील एक इंडो-नेपाळी कुकी आहे. जी भारतातील बिहार आणि उत्तर प्रदेश तसेच नेपाळच्या तराई प्रदेशात लोकप्रिय आहे. छठ पूजेदरम्यान ठेकुआ हा एक प्रसाद म्हणून देवाला अर्पण केला जातो. पुजेचा उपवास सोडण्यासाठी हा पदार्थ खातात. ठेकुआ बनवण्यासाठी फार काही खर्च किंवा सामानाची आवश्यकता नसते. तर, घरच्याघरी हा पदार्थ कसा बनवला जातो याची रेसिपी गृहिणी राजकुमारी सोनार यांनी सांगितली आहे.
advertisement
ठेकुआ बनवण्यासाठी लागणारे साहित्य
गव्हाचे पीठ ( जेवढे ठेकुआ बनवायचे आहेत त्या नुसार), देशी तूप, सुक्या खोबऱ्याची पूड किंवा किस, गूळ किंवा साखर, वेलची पूड, तळण्यासाठी तेल किंवा तूप, बारीक चिरलेला सुका मेवा हे साहित्य आवश्यक आहे.
1 वाटी चण्याची डाळ, 2 चमचे बेसन, 10 मिनिटांत तयार होतील चविष्ट विदर्भ स्टाईल कढी गोळे, रेसिपी पाहा
ठेकुआ बनवण्याची कृती
ठेकुआ बनवण्यासाठी प्रथम गव्हाच पीठ किंवा काहीजण मैदाही वापरतात. गव्हाच्या पीठात थोडासा रवा घालून ते छान तेलात किंवा तुपात भाजून घ्यायचं. त्यानंतर ते पीठ थोडं गरम असतानाच त्यात कोरड्या खोबऱ्याची पूड घालायची. बारीक चिरून घेतलेला सुका मेवाही घालू शकता. त्यानंतर त्यात पिठी साखर तुम्हाला किती गोड हव आहे त्या चवीनुसार घालायची आणि नंतर पाणी घालून पीठ छान मऊ मळून घ्यायच.
तुरीच्या दाण्यांपासून बनवा स्वादिष्ट वडे, बघा घरगुती रेसिपी, Video
त्यानंतर त्याचे लगेचच गोळे करून ते हातावर थोडे वड्याप्रमाणे पण जाडसर असे थापून घ्यायचे. जर डिझाइनचा लाकडी साचा असेल तर त्या ते गोळे ठेऊन त्या उंड्याला छान नक्षीदार असा आकार देता येतो. पण समजा तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही त्या कणकेच्या गोळ्यावर नक्षीदार चमच्याने किंवा वाटीनेही डिझाइन पाडू शकता. त्यानंतर ते तुपात किंवा तेलात तळून घ्यायचे. ठेकुआ तळताना शक्यतो मंद आचेवरच सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे. गॅस हाय फ्लेमवर ठेवून ठेकुआ तळले तर ते आतून कच्चे राहून बाहेरून करपू शकतात. त्यानंतर ते तळलेले ठेकुआ ताटात काढून घ्यायचे.
Food News : आता मुंबईत खा न्यूयॉर्क स्टाईल चिकन स्मॅश बर्गर; पाहा बनतो कसा Video
ठेकुआ बऱ्याच दिवस टिकणारा पदार्थ असल्यानं ते हवाबंद डब्यात भरून ठेवता येतात. त्यामुळे अनेक दिवस ठेकुआ आरामात खाऊ शकतो. तर, तुम्हालाही कधी गोड-धोड खाण्याची इच्छा झाली तर हा झटपट बनणारा ठेकुआ तुम्ही सुद्धा नक्कीच बनवू पाहू शकता.