TRENDING:

वेस्टपासून बेस्ट, जास्त पिकलेल्या केळीपासून बनवा उपवासाची चविष्ट रेसिपी, Video

Last Updated:

बऱ्याचदा जास्त पिकलेली केळी टाकून दिली जातात. मात्र, याच केळापासून उपवासाची टेस्टी रेसिपी बनवता येते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, 8 ऑक्टोबर: केळी हे फळ आपल्याकडे प्रत्येक घरात असतंच. त्यात उपवास म्हटलं की केळी आलीच. बऱ्याचदा केळी अधिक पिकली की टाकून दिली जातात. पण याच केळांपासून उपवासाची भन्नाट रेसिपी बनवता येते. विदर्भात केळीपासून उपवासाचे अपाल बनवले जातात. वर्धा येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर यांनी अपालची रेसिपी सांगितली आहे.
advertisement

अपालसाठी साहित्य

केळीपासून उपवासाचे अपाल बनवण्यासाठी पिकलेली केळी आवश्यक आहेत. त्यासोबतच शिंगाडा पीठ किंवा राजगिरा पीठ, वेलची पूड, गूळ आणि तळण्यासाठी तेल आवश्यक आहे. आपल्या गरजेनुसार हे साहित्य आपण घेऊ शकता.

नवरात्रीच्या उपवासाला 5 मिनिटात बनवा भगर आणि साबुदाण्याचा डोसा; पाहा रेसिपी पद्धत Video

कसे बनवायचे अपाल?

सर्वप्रथम एका बाऊलमध्ये केळी चांगली एकजीव करून घ्यायची आहेत. तुम्ही ते चमच्याने एकजीव करू शकता किंवा डायरेक्ट मिक्सरमधूनही काढू शकता. आता गॅसवर अर्धा कप पाणी घेऊन त्यात छोटी अर्धी वाटी गूळ ॲड करून गुळ चांगला विरघळल्यानंतर त्यात स्मॅश केलेली केळी ॲड करायची आहेत. लगेच राजगिरा किंवा शिंगाड्याचे पीठ ॲड करून एका परातीत काढून घ्यायचा आहे. थोडं कोमट असतानाच गोळा करून घ्यायचा आणि त्याची एक मोठी पोळी लाटून आपल्याला एखाद्या वाटीच्या सहाय्याने सारखे अपाल करून घ्यायचे आहेत. नंतर गरम तेलात तळून घेऊन गरमागरम सर्व्ह करून खाण्यासाठी हे केळीचे उपवासाचे अपाल तयार आहेत. जर तुम्हाला उपवासाचे अपाल करायचे नसतील तर शिंगाड्याच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही त्यात गव्हाचे पीठही ॲड करू शकता.

advertisement

घरगुती पद्धतीनं बनवा कोष्टी डाळ-कांदा, विदर्भातील खास रेसिपी, Video

वेस्ट पासून बेस्ट रेसिपी

सध्या उपवासाचे दिवस आहेत. त्यात एक नवीन उपवासाचा पदार्थ आपण ट्राय करू शकता. घरी पिकलेली केळी असली की यापुढे ती फेकून देण्याची गरज नाही. कारण याच केळी पासून अगदी झटपट उपवासाचे केळीचे अपाल बनवता येतात. वेस्ट पासून बेस्ट रेसिपी तयार होईल. विशेष म्हणजे ही रेसिपी सर्वांना आवडेल अशी आहे. मात्र या रेसिपी मध्ये पिकलेली केळी असल्यामुळे गोळा भिजवून तयार झाल्यावर अपाल लवकर बनवायचे आहेत. तसेच बनवल्यानंतर लगेच गरमागरम खायचाही आहे. कारण जास्त वेळ गोळा भिजवून ठेवून नंतर अपाल केल्यामुळे त्याची चव बिघडू शकते, असे शोभाताई सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
वेस्टपासून बेस्ट, जास्त पिकलेल्या केळीपासून बनवा उपवासाची चविष्ट रेसिपी, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल