गाजर-मिरचीचे लोणचं बनविण्यासाठी लागणारं साहित्य
गाजर, हिरवी मिरची, लिंबू, तेल, मोहरी, मोहरी डाळ, हिंग, हळद, मिरची पावडर, मीठ चवीनुसार हे साहित्य लागेल.
Matar Nuggets Recipe : घरातील सर्वच खातील आवडीने, हिवाळ्यात बनवा खास मटार नगेट्स, रेसिपीचा Video
गाजर-मिरचीचे लोणचं कृती
सुरुवातीला गाजर आणि मिरची स्वच्छ धुवून कपड्याने कोरडी करावीत आणि काप करून ठेवावेत. मोहरी डाळ 10-12 मिनिटं मंद आचेवर भाजून थंड करावी. पाव किलो तेल धूर येईपर्यंत गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद टाकावी. तेल थोडं थंड झाल्यावर लाल तिखट, थंड झालेली मोहरी डाळ आणि मीठ घालून मिक्स करावे. तेल पूर्ण थंड झाल्यावर लिंबूरस मिसळावा आणि शेवटी गाजर-मिरचीचे तुकडे घालून मिक्स करावे. एक दिवस मुरू द्यावे आणि दुसऱ्या दिवसापासून स्वादिष्ट गाजर-मिरची लोणचे खायला तयार आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 13, 2025 7:22 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Gajar Mirchi Lonche Recipe : हिवाळ्यात जेवणासोबत खायला चटपटीत हवंच, सोप्या पद्धतीने बनवा गाजर-मिरचीचे लोणचे, रेसिपीचा Video





