मुंबई : नवं वर्ष सुरू झाल्यानंतर पहिलाच सण मकर संक्रांती आली आहे. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सुगडाची पूजा करून सुवासिनी बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी बनवतात. पारपंरिक असलेली ही भाजी कशी बनवायची? याची रेसिपी आपल्याला मुंबईतील गृहिणी दक्षा रावेकर यांनी सांगितली आहे.
advertisement
भोगीची भाजी बनवण्यासाठी साहित्य :
धणे, जिरे, दालचिनी, लवंग, वेलची, हिंग, हळद, तिखट, मीठ, आल, गोडा मसाला, सुख खोबरं, धणे, तीळ वाटणे, बोर,पापडी, वांगी, गाजर, बटाटा, टोमॅटो, हरभरा, पावटे हे साहित्य लागेल.
भोगी स्पेशल तिळाची भाकरी, बनवा एकदम सोप्या पद्धतीने, रेसिपीचा संपूर्ण Video
भोगीची भाजी बनवण्यासाठी कृती
प्रथम आपल्याला कढईत खडे मसाले भाजून घ्याचे आहेत. ते गार करायला एका प्लेटमध्ये काढून द्यायचे. नंतर दुसरा मसाला म्हणजेच सुख खोबरं धने तीळ हे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत ते सुद्धा गार करायला एका प्लेटमध्ये काढून द्यायचे आहेत. आता आपल्याला कुकर घेऊन त्यात एक ते दीड चमचा तेल टाकायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर हिंग हळद आलं या टाकायचा आहे. नंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो हलका शिजत आला की जो मसाला आपण गार करायला ठेवला होता तो त्यामध्ये मिक्स करायचा. मिक्सरमध्ये बारून बारीक करून घ्यायचा आहे आणि तो मसाला त्यात टाकायचा आहे.
त्यानंतर त्यात सर्व भाज्या घालायच्या आहेत. ज्या भाज्या साहित्यामध्ये दिलेले आहेत त्या सर्व भाज्या कुकरमध्ये घालायच्या आहेत. एकीकडे पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आता कुकरमध्ये तिखट मीठ गोडा मसाला घालायचा आहे. ते सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यायचे आहे. नंतर त्यात गरम झालेले पाणी टाकायचे आहे. ते मिश्रण नीट हलवून घ्यायचं आहे त्यात चवीनुसार गूळ ही घालायचा आहे. ते सर्व नीट हलवून घ्यायचा आहे आणि त्याला जरा उकळी आली की कुकर नीट लावून घ्यायचा. कुकरच्या दोन-तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर भाज्यांचे मिश्रण हे छान पैकी एकजीव होतं आणि नंतर ही भाजी एका बाऊलमध्ये काढून घ्यायच्या अशा प्रकारे आपण भोगीच्या भाजीचा आनंद घेऊ शकतो.