लागणारे साहित्य (कमी आणि अगदी साधे)
अर्धा कप किसलेली कोबी (5 ते 6 जणांसाठी)
1 छोटा गाजर किसलेला (इच्छेनुसार)
मोठी वाटी मैदा / गव्हाचे पीठ
छोटी वाटी कॉर्नफ्लोअर
कोथिंबीर थोडीशी
मिरची- 2-3 बारीक चिरलेल्या
मीठ चवीनुसार
लाल मिरची पावडर — ½ टीस्पून
हळद-½ टीस्पून
तळण्यासाठी कमी तेल / एअर फ्राय
advertisement
मंचुरियन बनवण्यासाठी क्रिया
किसलेली कोबी आणि गाजर मोठ्या भांड्यात घ्या. त्यातील अतिरिक्त पाणी असेल तर हलकेच दाबून काढा.
या भाज्यांत मैदा, कॉर्नफ्लोअर, कोथिंबीर, मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर टाका. थोडे पाणी घालून सगळं एकसारखं मिसळून घट्ट मिश्रण तयार करा. आता छोटे-छोटे गोळे तयार करा.
बॉल्स फाटत नाहीत ना हे पाहा. फाटत असतील तर थोडा मैदा/कॉर्नफ्लोअर वाढवा.
तळण्याची अंतिम प्रक्रिया: शॅलो फ्राय किंवा एअर फ्राय करा. नाहीतर गरम तेलात बॉल्स टाका आणि हलक्या आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा. बाहेर काढून टिश्यूवर ठेवा म्हणजे अतिरिक्त तेल निघून जाईल.
टीप: हे मंचुरियन तुम्ही ग्रेव्हीमध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता किंवा सॉस, घरगुती शेजवान चटणीसोबत देखील खाऊ शकता.
आता घरच्याघरी, स्वच्छतेत, कमी तेलात आणि कमीत कमी साहित्यात वापरून स्वादिष्ट मंचुरियन नक्की बनवा.





