पौष्टिक ज्वारीचे धिरडे बनवण्यासाठी साहित्य
ज्वारीचे पीठ – 1 वाटी, तांदळाचे पीठ – अर्धी वाटी(ऐच्छिक, कुरकुरीतपणा येतो) कांदा – 1 मध्यम, बारीक चिरलेला, टोमॅटो – 1 लहान, बारीक चिरलेला, कोथिंबीर – 2 टेबलस्पून, बारीक चिरलेली, हिरव्या मिरच्या – 1-2, बारीक चिरलेल्या, जिरं – ½ टीस्पून, मीठ – चवीनुसार, पाणी – भिजवण्यासाठी, तेल – शेकण्यासाठी, गाजर – बारीक चिरलेले हे साहित्य लागेल.
advertisement
पौष्टिक ज्वारीचे धिरडे बनवण्याची कृती
साहित्य एकत्र करणे एका मोठ्या बाउलमध्ये ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ (जर वापरत असाल), कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं आणि मीठ घाला. पाणी घालून मिश्रण भिजवा. थोडं-थोडं पाणी घालून मध्यमसर पातळसर घोळ तयार करा. (पिठलं/थालीपीठाच्या पिठापेक्षा थोडं पातळ असावं) तवा गरम करा. नॉनस्टिक किंवा लोखंडी तवा गरम करून त्यावर थोडं तेल सोडा. एक पळी घोळ तव्यावर ओता आणि चमच्याने पसरवा. झाकण ठेवून मध्यम आचेवर 2-3 मिनिटं शेकून घ्या. मग उलथून दुसऱ्या बाजूनेही शेकून घ्या. तयार झालेलं धिरडं दही, लोणचं, लसूण चटणी किंवा एखाद्या चविष्ट भाजीसोबत गरम गरम सर्व्ह करा.
टीप:
* अधिक पौष्टिक बनवण्यासाठी किसलेले गाजर, पालक, मेथी याही भाज्या मिश्रणात घालू शकता.
* लहान मुलांसाठी मिरच्या कमी घालाव्यात.
* लोखंडी तवा वापरत असल्यास व्यवस्थित तेल घालून तवा माखावा, म्हणजे धिरडं चिकटणार नाही.