दहीपुरी बनवण्यासाठी साहित्य
1 वाटी दही, 1 वाटी रवा, 2 वाटी गव्हाचे पीठ, तळण्यासाठी तेल, वेलची पूड आणि सजावटीसाठी सुकामेवा आवश्यक आहे.
दहीपुरी बनवायची कृती
सर्वप्रथम एका भांड्यामध्ये रवा आणि गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि वेलची पूड अॅड करून त्यात दही घालायचं आहे. हे दही पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे. आता त्यात कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे. त्यानंतर सगळं आता चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. पाण्याच्या साह्याने घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आहे. या गोळ्याला दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. तो पर्यंत एका कढईमध्ये साखर आणि पाणी अॅड करून साखरेचा साधा पाक तयार करून घ्यायचा आहे.
advertisement
वाफवलेले तुरीचे दाणे आणि शेंगदाण्याचा कूट, कोवळ्या हरभऱ्याच्या पानांची अशी करा घरीच भाजी
आता दहा मिनिटांसाठी झाकून ठेवलेला पिठाचा भिजवलेला गोळा घेऊन मोठी जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. आता एका झाकणाने आपल्याला पाहिजे त्या आकाराची पुरी काढून घ्यायची आहे. या पुऱ्या आता तेलातून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता या पुऱ्या पाकात टाकून लगेच काढून घेऊन दुसऱ्या भांड्यात ठेवायचे आहेत. काही वेळाने या पुऱ्या छान मुरलेल्या आणि मऊसूत लागतील. पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत. त्यावर ड्रायफ्रूट्सने सजावट करून आपण सर्व्ह करू शकता.
ना ज्युसर, ना मिक्सर; या पद्धतीने 2 मिनिटांत बनवा संत्र्याचा ज्यूस
दहीपुरीला लागणारे साहित्य आपल्या घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध असतात. त्यामुळे आपण ही रेसिपी कधीही बनवू शकतो. विशेष म्हणजे घरातील सर्व मंडळी आवडीने खातील अशी ही रेसिपी बनवून तयार होते. त्यामुळे तुम्ही देखील एकदा तरी पाकातली दहीपुरी नक्की ट्राय करून बघा.