पालकाची चकली बनवण्यासाठी साहित्य:
धुतलेला पालक, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, उडदाच्या डाळीचे पीठ एकत्र करून तयार झालेलं चकलीचे पीठ, तिखट, मीठ, हळद, धने पूड, तीळ, ओवा, एक ते दोन चमचे बटर किंवा लोणी आणि तळण्यासाठी तेल हे साहित्य आवश्यक आहे.
ओल्या मटारची भजी कधी खाल्लेत का? घरीच बनवा सोपी रेसिपी Video
advertisement
पालकाची चकली बनवण्यासाठी कृती :
सर्वप्रथम धुतलेला पालक हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता मिक्सर मधून बारीक प्युरी करून घ्यायचा आहे. त्यानंतर एका वाटीत चकलीचे पीठ घेऊन पालकाची प्युरी अॅड करायची आहे. सोबतच त्यात हळद, तिखट, मीठ, धने पूड, ओवा, तीळ आणि गरज वाटल्यास त्यात पाणी अॅड करून घट्ट गोळा बनवुन घ्यायचा आहे. भिजवत असताना त्यात कडकडीत तेलाचं मोहन ॲड करायचं.
हा गोळा तयार झाल्यानंतर चकलीच्या साच्यामध्ये हे मिश्रण टाकून चकल्या पाडून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवर तेलात तळून घ्यायचे आहेत. चकली तळताना मोठ्या आचेवर आणि खूप जास्त गरम तेलात तळू नये मंद आचेवरच तळावेत कारण असे केल्याने चकली आतून चांगली शिजवून कुरकुरीत होऊन खाण्यासही रुचकर लागते. अशाप्रकारे पालकाची चविष्ट अशी कुरकुरीत चकली बनवून तयार आहे.
पुरणपोळीचा कंटाळा आलाय? झटपट तयार करा सोजीची गोड पोळी, पाहा रेसिपी Video
तर अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये कुरकुरीत आणि चविष्ट अशी हेल्दी पालकाची चकली ही रेसिपी आपण जाणून घेतली आहे. धुतलेला पालक, हिरवी मिरची, कडीपत्ता, तांदळाचे पीठ बेसन पीठ, उडदाच्या डाळीचे पीठ म्हणजेच चकलीचं एकत्र केलेलं पीठ, तिखट, मीठ, हळद, धने, पूड, ओव, तीळ तसेच थोडंसं लोणी या घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून स्वादिष्ट अशी पालकाची चकली बनवता येऊ शकते. तुम्ही देखील ही टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करून बघा.